पुणे - संकटसमयी मदतीला येते तीच खरी माणुसकी या वाक्याचा अनुभव आज संपूर्ण देश घेत आहेत. याच माणुसकीच्या भावनेतून पुण्यातील चार युवकांनी एकत्र येत पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देऊ केला आहे.
डॉ. गौरव सोमाणी, रोहित राठी, विशाल मोदी, विनीत राठी अशी यांची नावे असून ‘कर्तव्य’ या सामाजिक उपक्रमाअंतर्गत त्यांनी लॉकडाऊनच्या काळात गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किराणामालाचे कीट देत मदतीचा हात दिला आहे.
आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते वडगाव शेरी भागातील २५० गरजू कुटुंबांना आज या कीटचे वाटप करण्यात आले. डॉ. गौरव सोमाणी, रोहित राठी, विशाल मोदी, विनीत राठी आदी या वेळी उपस्थित होते. पुढील दोन दिवसात ‘कर्तव्य’च्या माध्यमातून मुळशी व कोथरूड भागातील ५०० कुटुंबांना देखील मदत करण्यात येणार आहे.
या कीटमध्ये तांदूळ, तेल, लाल मिरची पावडर, मीठ, साबण यांबरोबरच इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे, ज्याचा फायदा या काळात पुणे आणि आसपासच्या नागरिकांना होऊ शकेल. या एका कीटची किंमत ही रुपये ५०० इतकी असून त्याचे वाटप शहराच्या विविध भागातील गरजू कुटुंबीयांना करण्यात येईल.
या कामात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या वेळी त्यांच्याकडून करण्यात आले असून त्यासाठी 9545099995 / 9860638828 या क्रमांकावर संपर्क करावा.
0 Comments