ऑनलाइन सुविधा व ग्राहकांना सहाय्य अखंडपणे सुरळीत सुरू
* संकटाच्या काळातही सर्व दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती
पुणे - ‘कोविड-19’मुळे निर्माण झालेल्या सध्याच्या अभूतपूर्व संकटांच्या काळात, बजाज आलियान्झ लाइफ इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने आपली विक्री व व्यवसाय वाढीची प्रक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी काही त्वरित पावले उचलली आहेत.
आपले कामकाज, विक्री व ग्राहकसेवा या व्यवसाय प्रक्रिया 'नव्याने सामान्य' होण्यासाठी या कंपनीने आभासी (व्हर्च्युअल) प्लॅटफॉर्म वापरणे सुरू केले आहे. यातून ग्राहकांना त्यांची आयुर्विम्याबद्दलची उद्दिष्ट्ये साकारण्यास मदत करणे कंपनीला शक्य होत आहे.
कोरोना व्हायरसने जगभर नकारात्मक भावना निर्माण केलेली असताना, आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक भावना चिरंतन राहावी, याकरीता ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी’ने दहा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती दिली आहे.
सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षण व मदत पुरविण्याचे या कंपनीने ठरविले आहे. त्याचबरोबर कोरोनाचे संकट दूर झाल्यावरही पुढील काळात नवीन पद्धतीने काम करण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात येत आहे. टाळेबंदीच्या काळात घरून काम करण्यास कर्मचाऱ्यांना सोयीचे व्हावे, या दृष्टीने या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
कंपनीच्या अनेक उपक्रमांबद्दल बोलताना, ‘बजाज अलियान्झ लाइफ’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ म्हणाले, “हा एक कठीण काळ आहे आणि या काळात एक जबाबदार कॉर्पोरेट घटक म्हणून आमच्या कर्मचार्यांना व सर्व भागीदारांना पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्यच आहे.
कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देण्याने कामाच्या नवीन पद्धतीशी जुळवून घेणे त्यांना सहजशक्य होईल, याची आम्हाला खात्री आहे. तसेच, डिजिटल स्वरुपाचे व्यवहार करण्याची सुविधा ग्राहकांना दिल्याने ते स्वतःच्या विम्याविषयक गरजांची पूर्तता चांगल्या प्रकारे करीत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे.
आताच्या आव्हानात्मक दिवसांमध्ये आपण सर्वांनी एकत्र येण्याची, संकटाशी एकत्रित मुकाबला करण्याची गरज आहे. त्यातूनच आपण पुढील काळात उभ्या राहणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यास आपण सज्ज राहू शकू.”
ग्राहक, कर्मचारी आणि विक्री प्रतिनिधी यांच्यासाठी गोष्टी सुलभ करण्यासाठी, ‘बजाज अलियान्झ लाइफ’ने पुढील उपाय योजले आहेत :
ग्राहकांविषयी कटिबद्धता :
1. पॉलिसीधारकांच्या गरजा भागवण्यासाठी ‘बजाज अलियान्झ लाइफ’ने व्हॉट्सअॅप, चॅटबॉट बोइंग, लाइफ
असिस्ट मोबाईल अॅप आणि ग्राहक पोर्टल यांसारखे ‘डिजिटल टचपॉईंट’ उपलब्ध केले आहेत.
2. या ‘डिजिटल टचपॉइंट्स’द्वारे पॉलिसीचे नूतनीकरण, पेमेंट किंवा कोणत्याही अन्य मदतीसाठी
पॉलिसीधारक ऑनलाइन काम करू शकतात आणि या कामांचे व्यवस्थापनही करू शकतात.
3. ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’चा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी कंपनी आपल्या पॉलिसीधारकांशी सतत संपर्क
साधत आहे, तसेच ‘कोविड’शी संबंधित सर्व दाव्यांची कामे प्राधान्याने करण्याचे आश्वासन देत आहे.
4. ‘बजाज अलियान्झ लाइफ’ने पॉलिसीधारक आणि कर्मचार्यांना त्यांचे वित्तीय पोर्टफोलिओ व्यवस्थापित
करण्यासाठी वेबिनार, पॉडकास्ट आणि क्युरेट केलेल्या मालिका यांच्या माध्यमांतून गुंतवणूकीचे सल्ले
दिले आहेत.
विक्री प्रतिनिधी आणि कर्मचार्यांविषयी कटिबद्धता :
1. सर्व कर्मचारी घरातून सुरक्षितपणे काम करण्यासाठी सुसज्ज व्हावेत यासाठी बजाज अलियान्झ लाइफ
कंपनीने त्यांना ‘वर्क-फ्रॉम-होम’ची किट्स पुरवली आहेत.
2. ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांना डिजिटल सेवा देण्यासाठी कंपनीने आपल्या 70 हजारांहून
अधिक विमा सल्लागारांना ‘व्हर्च्युअल’ साधने वापरण्याचे पुन्हा प्रशिक्षण दिले.
3. कोविड संबंधित सहाय्यासाठी 24 तास, सातही दिवस आपत्कालीन वैद्यकीय मदत व संपर्क उपलब्ध
करून दिले आहेत.
4. कर्मचारी, भागीदार, ग्राहक आणि जनसामान्य यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कंपनीने प्रख्यात तज्ञांच्या
फिटनेस सत्रांचे ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ आयोजन समाज माध्यमांमधून केले. यामध्ये योग, ध्यान आणि
निरोगीपणा यांवरील सत्रांचा समावेश आहे.
‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’बद्दल
बजाज अलियान्झ लाइफ ही भारतातील आघाडीची खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक आहे. बजाज फिनसर्व्ह लिमिटेड आणि अलियान्झ एसई या दोन सामर्थ्यवान आणि यशस्वी कंपन्यांच्या भागिदारीतून ही कंपनी निर्माण झाली आहे. बजाज फिनसर्व्ह ही भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण नॉन-बँकिंग वित्तीय संस्था आहे, तर अलियान्झ एसई ही जगातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापक आणि विमा कंपनी आहे.
2001 मध्ये ‘बजाज अलियान्झ लाइफ’ने आपले कामकाज सुरू केले. दोन दशकांपेक्षाही कमी कालावधीत आपली उपस्थिती कंपनीने देशभरात विस्तारली. 556 शाखा, 80,000 हून अधिक एजंट्स (31 मार्च 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार), विश्वासू भागीदारांच्या सर्वसमावेशक संच आणि ऑनलाइन विक्री चॅनेल यांद्वारे लाखो ग्राहकांना ती सेवा देते. ‘लाइफ गोल्स.डन’ या ब्रॅंड आश्वासनातून कंपनी आरओएमसी (रिटर्न ऑफ मॉर्टॅलिटी चार्जेस) यासह, काही नावीन्यपूर्ण यूलिप योजना सादर करते.
अशी योजना आखणारी ती पहिली कंपनी ठरली आहे. ‘बजाज अलियान्झ लाइफ’ने ग्राहकांच्या आनंदात वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सतत परिवर्तन केले आहे. कंपनी अनेक ‘प्लॅटफॉर्म’द्वारे ग्राहकांशी सतत संपर्कात राहते. ‘बजाज अलियान्झ लाइफ प्लॅकॅथॉन’ या उपक्रमातून तिने 2020 मध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले आहे.
0 Comments