एबीआयएलतर्फे मुख्यमंत्री मदत निधीस १ कोटी रुपयांची मदत

पुणे जिल्हा प्रशासनास आपत्ती व्यवस्थापनासाठी रु. ५० लाखांचा निधी

ABIL provides Rs. 1 crore to CM Relief Fund

पुणे - शहरातील एबीआयएल समूहाने (अविनाश भोसले समूह) कोरोना विरुद्धच्या लढयासाठी मुख्यमंत्री मदत निधीस १ रुपये कोटी मदत केली आहे. त्याबरोबर पुणे जिल्हा प्रशासनास आपत्ती व्यवस्थापनाकरीता ५० लाख रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे.

कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर उपचार पद्धती पुण्यातील ससून रुग्णालयात उपलब्ध व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले वैद्यकीय उपकरण म्हणजे प्लाझ्मा सेपरेटर मशीन हे होय. तेही घेण्यासाठी एबीआयएलच्या वतीने रु. २८ लाख इतकी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त दररोज सुमारे ७०० हून अधिक गरिबांची जेवणाची मोफत व्यवस्था समूहातर्फे करण्यात येत आहे. तर आजपर्यंत १० हजारहून अधिक नागरिकांना किराणामाल सामान व सॅनिटायजरचे मोफत वाटप देखील करण्यात आले आहे.

Tags - ABIL provides Rs. 1 crore to CM Relief Fund

Post a Comment

0 Comments