पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीचा काळ वाढतच चालला आहे. अशा स्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. पण तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे विद्यार्थ्याना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरीत अभ्यासक्रम हा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. आकुर्डी येथील डॉ. डी. वाय.पाटील कॉलेज चे प्राध्यापक ऑनलाइन शिकवणीचा मार्ग अवलंबत आहेत.
गो टू मीटिंग , स्काईप ,झूम ॲपद्वारे व्हिडिओ लेक्चर्स घेण्यात येत आहे .हे लेक्चर प्राध्यापक त्यांच्या घरूनच व्हिडिओ द्वारे घेत आहे आणि विद्यार्थी आपल्या घरी बसून शिक्षण घेत आहे. या ॲपमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघेही एकमेकांशी संवाद साधू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका ही दूर होण्यास मदत होत आहे.
गुगल क्लास रुम,जिनोमियो द्वारे विविध विषयांचे नोट्स आणि त्याच द्वारे ऑनलाइन सराव परीक्षा ही घेतल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासही प्राध्यापकांना मदत होत आहे.फेसबुक, व्हॉट्सॲप द्वारेही खूप नवनवीन माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
लॉकडाऊन असले तरी विद्यार्थ्यांच्या या वेळेचा सदुपयोग होत आहे आणि विद्यार्थ्यांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती डॉ.डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी दिली.
0 Comments