पुणे विभागात कोरोना संसर्गाचे एकूण 104 रुग्ण

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

A total of 104 patients with corona infection in Pune region

पुणे -  विभागातील कोरोना सांसर्गिक रुग्णांची संख्या 104 झाली असून, पुणे जिल्ह्यात- 74, सातारा जिल्ह्यात - 3 सांगली जिल्ह्यात - 25 तसेच कोल्हापूर जिल्हयात 2  रुग्णांची नोंद झालेली आहे. विभागातून तपासणीसाठी एकुण 2 हजार 265 संशयित रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते.

त्यापैकी 2 हजार 58 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, 207 नमुन्यांच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा  आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 915 नमुने निगेटीव्ह आहेत व 104 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 19 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील कोरोना विषाणूच्या साथीच्या माहितीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर डाॅ. म्हैसेकर यांनी ही माहिती प्रसिद्धिमाध्यमांसाठी उपलब्ध करून दिली. ते पुढे म्हणाले की, पुणे विभागामधील 8 हजार 615 प्रवाशांपैकी 3 हजार 977 प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू असून 4 हजार 638 प्रवाशांबाबत पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत 16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 542  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे. विभागामध्ये सद्यःस्थितीत एकुण 88 ‍ठिकाणी क्वारंटाइन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकुण 12 हजार 850 बेड्स उपलब्ध आहेत.

विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा

पुणे विभागात असलेल्या  शासकीय धान्य गोदामात 23 हजार 411.708 मेट्रिक टन धान्यसाठा सध्या उपलब्ध आहे. पुणे विभागात अंत्योदय योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत 27 लाख 8 हजार 711 शिधापत्रिकाधारक  कुटुंबे नोंदित आहेत. त्यापैकी आतापर्यंत  9 लाख 4 हजार 604 कुटुंबांना गहू, साखर, तूरडाळ, चणा डा ळ व तांदळाचे 2 लाख 18 हजार 621.45 क्विंटल धान्य वितरण करण्यात आले आहे.

विभागातील मार्केटमध्ये अंदाजे 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची आवक झाली असून भाजीपाल्याची आवक 9 हजार 901 क्विंटल, फळांची  आवक 4 हजार 431 क्विंटल तसेच कांदा/ बटाट्याची 9 हजार 168 क्विंटल इतकी आवक झाली आहे. विभागात   दि.3 एप्रिल 2020 रोजी 101.84 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.70 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले असल्याचे डाॅ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Tags -A total of 104 patients with corona infection in Pune region 

Post a Comment

0 Comments