दोन उपकेंद्रांना जोडणारी नवीन वीजयंत्रणा केवळ दोनच दिवसांत उभारली

महावितरणच्या अधिकारी-कर्मचा-यांची जोरदार कामगिरी

 A new power plant connecting the two sub-stations was installed in just two days


पुणे - उपकेंद्रातील पाच एमव्हीए क्षमतेचा अजस्त्र पॉवर ट्रॉन्सफार्मर नादुरुस्त झाल्याने तो बदलण्यासाठी 10 दिवसांचा अवधी लक्षात घेता महावितरणकडून जवळच असलेल्या उपकेंद्रातील पॉवर ट्रॉन्सफार्मरशी संलग्न वीजयंत्रणा दोन दिवसांत उभारून शुक्रवारी दि. 3 एप्रिलला जुन्नर तालुक्यातील (जि. पुणे) तीन उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पोलिस खात्याच्या निर्देशानुसार योग्य दक्षता व काळजी घेऊन ही कामगिरी करण्यात आली. 

मंचर विभागाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील कोलवडी उपकेंद्रातील 5 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रॉन्सफार्मर वादळी पावसामुळे 31 मार्चला सकाळी बंद पडला. या ट्रॉन्सफार्मरमधून तीन उच्चदाब वीजवाहिन्यांना वीजपुरवठा केला जातो. त्यातून सात गावांमधील 3550 वीजग्राहकांना वीजपुरवठा होतो.

बंद पडलेल्या ट्रॉन्सफार्मरच्या सर्व चाचण्या घेतल्यानंतर तो नादुरुस्त झाल्याचे व बदलविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या कामांसाठी किमान 10 दिवसांचा कालावधी लागणार होता. कोरोना संसर्गाच्या आपत्तीमुळे सद्यस्थितीत वाहतूक, मनुष्यबळ व इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मात्र बंद पडलेल्या ट्रॉन्सफार्मरवरील तीन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा त्याच उपकेंद्रातील दुसऱ्या पॉवर ट्रॉन्सफार्मरमधून पर्यायी स्वरुपात सुरु ठेवण्यात आला होता.

दरम्यान, कोलवडीपासून अडीच किलोमीटर अंतरावरील नेटवड उपकेंद्रात दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून एक अतिरिक्त पॉवर ट्रॉन्सफार्मर मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्याचे काही कामे शिल्लक होते. ही कामे लवकरात लवकर करून कोलवडी ते नेटवड अशी अडीच किलोमीटर उच्चदाब वीजवाहिन्यांची वीजयंत्रणा उभारून वीजपुरवठा करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला.

त्याप्रमाणे दि. 1 व 2 रोजी नेटवड उपकेंद्रातील पॉवर ट्रॉन्सफार्मरचे उर्वरित सर्व कामे व विविध चाचण्यांचे काम अविश्रांत दिवसरात्र करण्यात आले. दुसरीकडे कोलवडी ते नेटवड उपकेंद्रादरम्यान नवीन वीजखांब व उच्चदाब वीजवाहिन्या उभारण्याचे काम देखील अविश्रांत पूर्णत्वास गेले.

नेटवड उपकेंद्रातील पॉवर ट्रॉन्सफार्मर आणि दोन उपकेंद्रांदरम्यान नवीन उभारलेली वीजयंत्रणा यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि शुक्रवारी (दि. 3) दुपारी तीन वाजता पॉवर ट्रॉन्सफार्मर तसेच कोलवडी उपकेंद्रातील तीनही वीजवाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार (पुणे ग्रामीण मंडल), श्री. विजय भाटकर (पायाभूत आराखडा), कार्यकारी अभियंता श्री. हेमचंद्र नारखेडे (मंचर), श्री. किशोर सोनपरोते (चाचणी) तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. एस. वाय पत्की, उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे व डी. व्ही. जोशी, सहाय्यक अभियंता एस. टी. अवचार, आर. के. वानखेडे, व्ही. बी. शिंदे तसेच तांत्रिक कर्मचारी जी. व्ही. आणेराव, एस. बी. बाणमारे, पी. एस. उमळे, एस. एल. जोरी, एम. के. चौधरी, एम. एच. शिंदे, के. व्ही. गायकवाड, आर. एम. कहार, एस. एस. वाघमारे, एम. के. भास्कर, सचिन देठे, समीर शेख यांच्यासह कंत्राटदार स्पेसएज इलेक्ट्रिकल्स यांनी या कामात योगदान दिले.

Tags - A new power plant connecting the two sub-stations was installed in just two days

Post a Comment

0 Comments