सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला 'नॅक' मूल्यांकनात 'अ' श्रेणी

विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख व कौशल्य आधारित , सर्वांगीण विकासाचे व जागतिक दर्जाचे

शिक्षण देण्यावर 'सूर्यदत्त'चा भर : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला (एसआयएमएमसी) 'नॅक'कडून 'अ' श्रेणी


पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला (एसआयएमएमसी) राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेने (नॅक) शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनात  'अ' श्रेणी प्रदान केली  आहे. या प्रतिष्ठित संस्थेकडून मिळालेल्या मान्यतेमुळे सूर्यदत्तची शिक्षणातील उत्कृष्टतेसाठीची वचनबद्धता आणि गुणवत्ता मानके उंचावण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित झाले आहेत.

'नॅक'कडून मूल्यांकनाची ही प्रक्रिया सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राबविण्यात आली. यामध्ये संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामगिरीचे सर्वांगीण मूल्यांकन करण्यात आले. अभ्यासक्रमाचे पैलू, अध्यापन, शिक्षण आणि मूल्यांकन, संशोधन, नवोपक्रम आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिकण्याची साधने, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांची प्रगती, तसेच शासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा प्रभावी उपयोग सिद्ध करीत सूर्यदत्तने 'नॅक' मूल्यांकनात पुन्हा एकदा 'अ' श्रेणीवर आपला ठसा उमटवला.

सूर्यदत्त'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी या यशाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. 'नॅक'कडून मिळालेल्या 'अ' श्रेणीमुळे आमचे मनोधैर्य वाढले असून, आणखी जोमाने चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या यशात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी समर्पित भावनेने केलेले परिश्रम, दिलेला सहभाग महत्वाचा आहे.

सूर्यदत्त समूह समकालीन आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून प्रेरित आहे, उद्योगाच्या सध्याच्या गरजांनुसार उच्च दर्जाचे संशोधन आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यासह सर्वांसाठी शिक्षण हे आमचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी यापुढेही आम्ही प्रयत्न करत राहू, अशी भावना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केली.

'सूर्यदत्त' समूहातील 'एसआयएमएमसी' ही व्यवस्थापनाचे शिक्षण देणारी महत्वपूर्ण इन्स्टिट्यूट आहे.एआयसीटीई -सीआयआय रँकिंग मध्ये गेली सहा वर्ष प्लॅटिनम तर टॉप फिफ्टी बी स्कूल्स मध्ये हि सातत्याने प्लॅटिनम रँकिंग प्राप्त झाले आहे .   व्यावसायिक नेतृत्व घडविण्यासाठी नवीन अध्यापन पद्धती, अत्याधुनिक संशोधन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेची वचनबद्धता यावर संस्थेने भर दिलेला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यतेने एमबीए व एमसीए , बीबीए , बीसीए हे पूर्ण वेळ, तर 'पीजीडीएम' हा अर्धवेळ अभ्यासक्रम चालविण्यात येतो. 'सूर्यदत्त'मध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनोखे शिक्षणशास्त्र अवलंबले जाते. त्यामध्ये अनुभवाधारित, सर्वसमावेशक, एकात्मिक, शोधाभिमुख, विद्यार्थी-केंद्रित, चर्चाधारित, लवचिक आणि आनंददायक शिक्षणाचा समावेश आहे. 

स्टार्टअप संस्कृती रुजविण्यासाठी येथे इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर चालवले जाते. विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाभिमुख वृत्ती विकसित व्हावी, यासाठी स्टार्टअप फेस्टिवल, डिझाईन थिंकिंग कार्यशाळा, प्रात्यक्षिक शिक्षणाची सत्रे, उद्योग कल्पनांच्या स्पर्धा, सेमिनार्स, हॅकेथॉन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद व सहली आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते.

एआयएमए बिझ लॅब, इनोव्हेशन नेक्स्ट लॅब, एआय लॅब या स्वरूपात येथे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात आले असून त्याद्वारे संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. उद्योग क्षेत्रातील नवे प्रवाह, बदल विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी मार्गदर्शन केले जाते.अलुमिनि सेल चा यामध्ये असणारा सहभाग महत्वपूर्ण असतो .

संस्थेला मिळालेल्या ए श्रेणीमुळे संस्थेस स्वायत्तता  मिळणे शक्य झाले आहे . या करीता संस्थेचे व्यवस्थापन प्रयत्नशील आहे . यामुळे नवीन धोरणानुसार , विद्यार्थ्यांना आवश्यक परंतु नवे असे अभ्यासक्रम अंतर्भूत करणेचा संस्थेचा मनोदय सफल होईल. वर्ष २०२५-२६ पासून असे अभ्यासक्रम सुरु करण्याचा संस्थेचा संकल्प आहे .

प्रा डॉ संजय बी चोरडिया संचालक एसआयएमएमसी , कोअर टीम नॅक व व्यवस्थापन तसेच शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी , पालक , भागधारक  यांचे सुषमा चोरडिया उपाध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन यांनी संस्था , विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांच्या  वतीने अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीकरता शुभेच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments