सोनालिका ने मे महिन्यात केली १३ हजार ३३८ ट्रॅक्टरची विक्री

५.२ टक्के वाढीची केली नोंद 


पुणे : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिकाने आपल्या हेवी ड्यूटी ट्रॅक्टरकरिता असलेली शेतकऱ्यांचे प्रेम व विश्वास यांना नेहमीच मोलाचे स्थान दिले आहे. आता मे २०२४ महिन्यात वाढीची एक नवी कथा कंपनीने रचली आहे.

कंपनीने एकंदर  १३,३३८  ट्रॅक्टरची विक्री करत ५.२ टक्के वाढीची नोंद केली असून उद्योगाच्या वाढीच्या दराला मागे टाकले आहे. सोनालिकाच्या दृष्टीने कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांचा उद्धार हा आर्थिकदृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कंपनीच्या २०-१२० एचपी गटातील हेवी ड्यूटी ट्रॅक्टरची संपूर्ण श्रेणी ही सर्वच बाबतीत ग्राहकांना सर्वोच्च समाधान देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

भारतीय भूमीत पावसाळ्याचे आगमन झालेले असून सरासरीपेक्षा यंदा जास्त पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कृषीप्रधान अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांसाठी वाढीव शेती उत्पादनाच्या आशा कायम आहेत. सोनालिका ट्रॅक्टर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आक्रमकपणे आगेकूच करत असून तिने भारतीय शेतकऱ्यांसाठी नवयुगातील तंत्रज्ञानाला वैयक्तिक रूप देण्याची आपली सर्व धोरणे व ऊर्जा यांना कमाल पातळीवर आणले आहे. शेतकऱ्यांनी किफायती किमतीला सोनालिका हेवी ड्यूटी ट्रॅक्टर घेऊन आपल्या शेतीचे यांत्रिकीकरण करावे यासाठी कंपनीने नुकतेच ‘जून जॅकपॉट’ ऑफर सादर केली आहे.

या नवीन कामगिरीबद्दल बोलताना, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, खरीपाच्या हंगामाची सुरूवात झाल्याने ट्रॅक्टर खरेदीत वेग आला आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणाच्या अपरिहार्य असा बदल हळूहळू आकाराला येत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.

कृषी अर्थव्यस्थेत उत्पादनामध्ये पावसाळ्याचे कळीची भूमिका असते आणि भारताच्या शेतीच्या परिस्थितीत केवळ नवीन युगातील तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यानेच मूलभूत बदल घडून येईल. या उत्क्रांतीचे नेतृत्व करण्यात आम्ही अग्रभागी आहोत, ही आमच्यासाठी उत्साहाची बाब आहे आणि जून २०२४ मध्ये शेतकऱ्यांसाठी अनुकूल अशी योजना आम्ही सादर केली आहे. पुढे जात असताना नवीन प्रगत हेवी ड्यूटी ट्रॅक्टर आम्ही सादर करत राहू.” 

Post a Comment

0 Comments