अलार्ड युनिव्हर्सिटी तळागळातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध

विद्यापीठाकडून क्रीडा व  अन्य शिष्यवृत्तीचे वितरण

महाराष्ट्र प्रिमियम लीगच्या कोल्हापूर टस्कर्सला सपोर्ट 


पुणे : तळागळातील सर्व खेळांना प्रोत्साहन आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या अलार्ड विद्यापीठाने महाराष्ट्र प्रीमियर लगीच्या कोल्हापूर टस्कर्स संघाला महाराष्ट्रात खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या सोबतच संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठीसह त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती पत्रांचे वाटप केले. अशी माहिती अलार्ड विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व कुलधीपती डॉ. एल.आर.यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या पत्रकार परिषदेला डॉ. राम यादव, कोल्हापूर टस्कर्सचा कर्णधार राहुल त्रिपाठी आणि अलार्ड विद्यापीठाच्या मार्केटिंग विभागाचे संचालक पी.ए.व्ही. शेखर उपस्थित होते. 

फूटबॉलमध्ये राज्यस्तरीय पदक मिळविलेल्या श्रृती माने हिला ५० टक्के  शिष्यवृत्ती आणि स्विमिंगमध्ये  राष्ट्रीय पदक विजेता कुसुम कुमावत हिला ७५ टक्के शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. त्याच बरोबर इतर विभागातील ललिता चौधरी, हर्षवर्धन वाजे, पृथ्वीराज चव्हाण, शुभम जोशी, लेफ्टनंट कर्नल अविनाश बी पडियार, मिल्टन दास, विशाल वेदक, चैताली घुमरे, सौम्या झा, श्रावणी पुजारी, श्रुती माने, कुसुम कुमावत या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. 

डॉ.एल.आर.यादव म्हणाले, हम अलग है, हम अलार्ड है, हे विधान प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठााने अ‍ॅथलेटिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धता अधोरेखित केली आहे. आमच्या क्रीडा शिष्यवृत्ती आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्सच्या प्रायोजकत्वाद्वारे युवा खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आम्ही रोमांचित आहोत. आमचे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विश्वास ठेवते आणि क्रीडा क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावते. येथील मैदान अत्याधुनिक क्रीडा सुविधांनी सुसज्ज आहे. 

कोल्हापूर टस्कर्सचा कर्णधार राहुल त्रिपाठी म्हणाले, अलार्ड युनिव्हर्सिटी पुणेशी जोडले जाणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. ही एक संस्था अशी आहे जी खरोखरच खेळ आणि तरूण प्रतिभा विकसित करण्यावर अधिक भर देते. क्रीडा शिष्यवृत्ती आणि तळागळातील खेळ हे कोल्हापूर टस्कर्ससाठी महत्वाचे प्रोत्साहन आहेत आणि या उपक्रमाचा भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. 

अलार्ड युनिव्हर्सिटी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेची संस्कृती वाढविण्यासाठी आणि प्रतिभावन विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यासाठी वचनबद्ध आहे. या वर्षी कुलधीपती डॉ.एल.आर.यादव आणि कॅप्टन राहुल त्रिपाठी यांनी शिष्यवृत्ती निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या शिष्यवृत्तीचे पत्र दिले. ज्यामध्ये त्यांच्या विविध क्रीडा शाखेतील असामान्य प्रतिभा आणि क्षमता ओळखली जाईल. 

महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील कोल्हापूर टस्कर्स संघाला प्रायोजित केल्याबद्दल अलार्ड विद्यापीठाला अभिमान वाटतो. खेळांना पाठिंबा देण्यासाठी आणि तरुण खेळाडूंना चमकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ तळागळातील खेळांशी भागीदारी करण्यासाठी वचनबद्ध आहे. 

महाराष्ट्र प्रीमियर लीग ही एक प्रमुख क्रिकेट स्पर्धा आहे जी राज्यभरातील सर्वोत्तम प्रतिभांना एकत्र आणते तसेच नवोदित क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक वातावरणही देते. 

हम अलग है, हम अलार्ड है, हे सर्वांना दाखवण्यासाठी विद्यापीठाने आपल्या कॅम्पसमध्ये फुटबॉल खेळासाठी फिफा आकाराचे मैदान तयार केले आहे. येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्याने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या खेळांमध्ये प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम केले आहे. हे फुटबॉल, क्रिकेट आणि इतर प्रमुख खेळांसाठी सुसज्ज आहे. 


Post a Comment

0 Comments