सुवर्णयुग तरुण मंडळाचा १६ फेब्रुवारीपासून शिवजयंती निमित्त शिवमहोत्सव

शिवव्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, राज्याभिषेकासह जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन


पुणे : सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सवाला आजपासून (दि.१६) प्रारंभ होत आहे. दिनांक १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे करण्यात आले आहे.

यामध्ये शिवव्याख्यान, अमर आग, गोष्ट शिवछत्रपतींच्या अस्सल चित्रांची, शिवराज्याभिषेक सोहळा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिली.

 शिवमहोत्सवाचे उद्घाटन परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या हस्ते दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यानंतर इतिहास अभ्यासक, लेखक व शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान होणार आहे. शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी मंदार परळीकर व सहका-यांचा भारतीय कला वैभव प्रस्तुत अमर आग हा कार्यक्रम होईल.

गोष्ट शिवछत्रपतींच्या अस्सल चित्रांची याविषयावरील लेखक केतन पुरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन रविवार, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.

शिवजयंतीच्या दिवशी सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी वाजता मुख्य शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार असून शिवजन्माचा पाळणा देखील होईल. सोमवारी सायंकाळी मयूर थिएटर्स निर्मित नितीन सूयार्जीराव मोरे प्रस्तुत शिवराज्याभिषेक सोहळा हे ५० कलाकारांसहित भव्य नाटक होणार आहे. सर्व कार्यक्रम शिवप्रेमींसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रकाश चव्हाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments