अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगवर भारतीय एक्सपोर्टर्स बंपर हॉलिडे शॉपिंग सीझनसाठी तयार


बंगळुरू : भारतीय एक्सपोर्टर्स त्यांच्या अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग प्रोग्रामवर वार्षिक ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे (BFCM) सेल इव्हेंट दरम्यान जगभरातील ग्राहकांना लाखो 'मेड इन इंडिया' उत्पादने सादर करण्यासाठी सज्ज असल्याचे अॅमेझॉन ने आज जाहीर केले.

गेल्या वर्षीच्या कार्यक्रमापेक्षा यंदा ग्राहकांना खरेदीसाठी अधिक दिवस मिळणार आहेत. भारतीय एक्सपोर्टर्सनी १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आणि २७ नोव्हेंबरला संपणाऱ्या सेल इव्हेंटसाठी अॅमेझॉनच्या जागतिक वेबसाइट्सवर ५०,००० हून अधिक नवीन उत्पादने सादर केली आहेत.

जगभरात अॅमेझॉन ग्राहकांना भारतभरातील एक्सपोर्टर्सतर्फे घर आणि किचन, STEM खेळण्यांसह वस्त्रप्रावरणे, आरोग्य आणि वैयक्तिक काळजी, ऑफिस उत्पादने, दागिने, सौंदर्य आणि फर्निचर अशी विविध श्रेणींमध्ये उत्पादने शोधणे आणि त्यांचा आनंद घेणे शक्य होईल. ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे हे जागतिक स्तरावर सुट्टीच्या हंगामाची सुरुवात करणारे महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहेत आणि यावेळी ग्राहक घरी वापरण्यासाठी आणि मित्र आणि कुटुंबीयांना भेटवस्तू देण्यासाठीच्या वस्तू शोधत असतात.


अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगसह भारतीय एक्सपोर्टर्ससाठी बहुविध मुख्य सीझन

अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग एक्सपोर्टर्सना वर्षभरातील बहुविध मुख्य शॉपिंग सीझन आणि जागतिक कार्यक्रमांमध्ये अॅक्सेस देतो. बीएफसीएम सेल, प्राइम डे इत्यादीसारखे कार्यक्रम भारतीय एक्सपोर्टर्ससाठी परंपरेने उच्च वाढीचे काळ आहेत. १० आणि ११ ऑक्टोबर २०२३ रोजी नुकत्याच पार पडलेल्या प्राइम बिग डील डेज सेलमध्ये, अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगवरील भारतीय एक्सपोर्टर्सनी त्यांचा व्यवसाय नेहमीच्या (BAU) कालावधीपेक्षा जवळजवळ वर्ष दर वर्ष ७०% आणि १७०% ने वाढल्याचे पाहिले.

घर <७८% वार्षिक >, सौंदर्य <१९६% वार्षिक >, स्वयंपाकघर <७९% वार्षिक >, आरोग्य आणि वैयक्तिक काळजी <८७% वार्षिक >, फर्निचर <९५% वार्षिक > या श्रेणींमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. भारतीय एक्सपोर्टर्ससाठी यूएस आणि यूके व्यवसायाचा मोठा भाग चालवत असल्याचे दिसले.  जपान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश भारतीय निर्यातदारांसाठी नवीन उच्च वाढीचे स्थान म्हणून उदयास आले आहेत आणि विक्रीच्या दोन दिवसांमध्ये विक्रेत्यांनी वार्षिक २००% वाढ नोंदवली आहे. विक्रीदरम्यान भारतीय एक्सपोर्टर्सनी विकलेल्या मुख्य ५ उत्पादनांमध्ये बेडशीट्स, स्क्रब अ‍ॅपेरल सेट, ओरल केअर प्रॉडक्ट्स, रग्ज आणि स्वयंपाकघरातील उत्पादने यांचा समावेश आहे.

जुलै २०२३ मध्ये प्राइम डे सेल दरम्यान, अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगवर भारतीय एक्सपोर्टर्सनी त्यांचा व्यवसाय जवळपास ७०% (वर्ष दर वर्ष) वाढल्याचे पाहिले. यामध्ये सौंदर्य <१२५% वार्षिक वाढ>, पोशाख <१२२ % वार्षिक वाढ>, घर <८१% वार्षिक वाढ>, फर्निचर <७५% वार्षिक वाढ> आणि स्वयंपाकघर <५२ % वार्षिक वाढ> यांसारख्या श्रेणींमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.

यूएस, यूके आणि मध्य पूर्व येथून भारतीय एक्सपोर्टर्ससाठी व्यवसाय वाढीला चालना मिळाली. भारतीय एक्सपोर्टर्ससाठी जपान हे नवीन उच्च वाढीचे गंतव्यस्थान म्हणून उदयास आले असून विक्रेत्यांनी वार्षिक मध्ये अनुक्रमे ५५ % पेक्षा जास्त व्यवसाय वाढ पाहिली आहे. प्राइम डे 2023 दरम्यान भारतीय एक्सपोर्टर्सनी विकलेल्या आघाडीच्या ५ उत्पादनांमध्ये बेडशीट, स्क्रब अ‍ॅपेरल सेट, STEM खेळणी, स्वयंपाकघरातील उत्पादने आणि विंडशिल्ड सनशेडस यांचा समावेश होता.

अॅमेझॉन इंडियाच्या ग्लोबल ट्रेडचे संचालक भूपेन वाकणकर म्हणाले, “बीएफसीएम सेलने सुरू होणारा जागतिक सुट्टीचा हंगाम अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगवर भारतीय एक्सपोर्टर्ससाठी नेहमीच महत्त्वाचा वाढीचा काळ राहिला आहे. हजारो भारतीय एक्सपोर्टर्स जागतिक स्तरावर ग्राहकांसाठी मेड इन इंडिया उत्पादनांची विशाल श्रेणी सादर करत असताना आम्हाला विश्वास आहे की 2023 BFCM विक्री आणि सुट्टीचा हंगाम आमच्या कार्यक्रमामध्ये  विक्रेत्यांची वेगवान वाढ होण्यास मदत करेल.

SEND वर सागरी मालवाहतूक आणि कमी केलेली सदस्यता शुल्क योजना ही सर्व आकारांच्या व्यवसायांसाठी निर्यात सुलभ करण्याच्या अॅमेझॉनच्या प्रयत्नाचा भाग आहे. आम्ही देशभरातील लाखो उद्योजकांना ईकॉमर्स निर्यातीचा विस्तार करण्याची संधी देण्यासाठी पावले उचलत आहोत कारण आम्ही २०२५ पर्यंत भारतातून २० अब्ज डॉलरची संचयी ईकॉमर्स निर्यात सक्षम करण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने काम करत आहोत.”

सुट्टीच्या मोसमात भारतीय एक्सपोर्टर्सना फायदा मिळवून देण्यासाठी अॅमेझॉनचा पुढाकार

आगामी सुट्टीच्या हंगामात अधिक व्यवसायांना ईकॉमर्स एक्सपोर्टचा लाभ घेण्यासाठी आणि जागतिक स्तरावर विक्री करण्यास सक्षम करण्यासाठी, अॅमेझॉन ने त्यांच्या ग्लोबल सेलिंग प्रोग्राममध्ये सामील होणाऱ्या भारतीय एक्सपोर्टर्ससाठी पहिल्या तीन महिन्यांकरता सदस्यता शुल्क १२० $ * (*३९.९९ प्रति महिना) पासून फक्त १ $ पर्यंत कमी केले आहे. ३१ मार्च २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी या कार्यक्रमात सामील होणार्‍या एक्सपोर्टर्ससाठी ही मर्यादित कालावधीची ऑफर उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, स्पर्धात्मक दर आणि एंड-टू-एंड ट्रॅकेबिलिटी जे एक्सपोर्टर्सना त्यांच्या इन्व्हेंटरीचे उत्तम नियोजन करण्यास अनुमती देत अॅमेझॉनने विना अडथळा सागरी मालवाहतूक दळणवळण सुविधा सक्षम करून SEND नावाच्या त्यांच्या मुख्य क्रॉस-बॉर्डर लॉजिस्टिक प्रोग्रामचा विस्तार केला आहे. लहान पार्सल वितरणासाठी हवाई वाहक सेवा पुरवत SEND एक वर्षा पेक्षा जास्त काळ सक्रिय आहे. SEND सह, भारतीय एक्सपोर्टर्स हवाई आणि महासागर माध्यमातून बहुविध थर्ड पार्टी सेवा पुरवठादारांकडून यूएस मधील अॅमेझॉन पूर्तता केंद्रांवर त्यांचा माल पाठवण्यासाठी क्रॉस-बॉर्डर लॉजिस्टिक सेवांचा लाभ घेऊ शकतात.

स्पर्धात्मक दर आणि अॅमेझॉनचे सुलभ शिपिंग यांच्या जोडीला संपूर्ण प्रक्रिया अखंडपणे अॅमेझॉन सेलर सेंट्रल वर एकत्रित केली आहे. तिथे घरोघरी पिकअप आणि डिलिव्हरी आणि त्रास-मुक्त दस्तऐवजांसह बुकिंग, ट्रॅकिंग आणि पेमेंट सेवा विनाअडथळा केली जाते. २०२२ मध्ये SEND सादर करण्यात आले असून हजारो एक्सपोर्टर्स अधिक कार्यक्षम इन्व्हेंटरी व्यवस्थापन योजनांसह आधीपासूनच शिपमेंट व्हिजिबिलिटी आणि वेळेवर वितरण यांसह या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.

विक्रेते कोट - होमस्पन ग्लोबलचे व्यवसाय प्रमुख हेमंत पिशारोडी म्हणाले, “अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगवर आमचा व्यवसाय प्राइम डे सारख्या पीक शॉपिंग इव्हेंटसह २०२३ मध्ये वर्ष दर वर्ष चार पट जवळपास ट्रेंडिंग आहे. त्यामुळे जवळपास BAU पेक्षा १० पट जास्त विक्री झाली आहे.

प्रमुख इव्हेंटससाठीच्या आमच्या दृष्टिकोनात नवीन लॉन्चची तयारी,  उत्पादनता वाढवणे आणि आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम डील आणि ऑफर डिझाइन करणे समाविष्ट आहे. आम्ही खरोखरच ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे सेल इव्हेंटबद्दल उत्सुक आहोत आणि सुट्टीच्या सीझन मध्ये अशीच व्यवसायात वाढ होण्याची वाट पाहत आहेत.”

एक नाविन्यपूर्ण रोबोटिक्स स्टार्ट-अप Miko चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेह वासवानी, म्हणाले, “आम्ही जगभरातील तरुण विद्यार्थ्यांना नवीनतम तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आमच्या Miko 3 Al रोबोटची ची Miko Mini ही एक छोटी आवृत्ती सादर केली. जागतिक स्तरावर अॅमेझॉन प्राइम डे दरम्यान ती खूपच लोकप्रिय झाली आणि परिणामी आमचा ग्राहक आधार वाढला आणि विक्रीत २० पट जास्त वाढ झाली. आता, सुट्टीचा हंगाम जवळ आला आहे, आम्ही मोठे उद्दिष्ट ठेवले आहे आणि न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर प्रचार मोहीम चालवत आहेत.

जागतिक स्तरावर आमच्या ग्राहकांसोबत सुट्टीच्या उत्साही वातावरणाचा एक भाग होण्यासाठी आणि त्यांना त्यांचा आवडता Miko रोबोट खरेदी करता यावा यासाठी उत्सुक आहोत.

Post a Comment

0 Comments