१.१३५ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा महत्त्वपूर्ण व्यवहार पूर्ण
पुणे : वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील दूरदर्शी स्विस कंपनी मेडअलायन्स, कॉर्डिस या कंपनीद्वारे यशस्वीपणे अधिग्रहीत झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. १.१३५ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या (सुमारे १०,००० कोटी रुपये) व्यवहारातून हे अधिग्रहण झाले आहे. वैद्यकीय नवप्रवर्तनाच्या क्षेत्रातील हा एक उल्लेखनीय मैलाचा दगड ठरला आहे; जो जागतिक आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जाण्याची आमची सामाईक कटिबद्धता पुढे नेत आहे.
मेडअलायन्स हे औषध-उपकरण यांचा संयुक्तपणे वापर करण्याच्या क्षेत्रातील एक आद्य प्रवर्तक आहेत. आपल्या संशोधनातून त्यांनी पेटंटप्राप्त सिरोलिमस औषध-निक्षालन उपकरण (सिरोलीमस ड्रग एल्यूटिंग बलून), सेल्युशन एसएलआर हा एक अभूतपूर्व वैद्यकीय उपाय शोधला आहे.
स्टेंटमुक्त पीसीआय अॅन्जिओप्लास्टीच्या क्षेत्रातील या क्रांतिकारी शोधामुळे आवश्यक औषधांचा पूर्णपणे व प्रभावी वापर करणे शक्य होते. सायफर या औषध-निक्षालन स्टेंटचा १९९९ मध्ये शोध लावणाऱ्या या क्षेत्रातील अध्वर्यू कंपनी कॉर्डिससोबत हे संशोधन होणे, ही एक तर्कसंगत घटनाच आहे.
अनेक वर्षांच्या संशोधनाची, तसेच आशिया, युरोप आणि अमेरिकन संयुक्त संघराज्यांत निरंतर चालू असणाऱ्या यशस्वी वैद्यकीय अभ्यासांची परिणती सीई चिन्हाच्या मान्यता मिळणे व तपासणी उपकरण मान्यताप्राप्तीच्या दृष्टीने अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचे चार संकेत मिळण्यामध्ये झाली आहे. असे श्री. अमित बोहोरा यांनी नमूद केले.
मेडअलायन्सचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ्री बी. जंप म्हणाले की, स्थापनेपासूनच मेडअलायन्सच्या व्यवसायात अमित यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. व्यवस्थापन सल्लागार म्हणून, तसेच जागतिक व्यापार गटाचे व आशियाई चिकित्सा गटाचे प्रमुख म्हणून आमच्या यशामध्ये त्यांचा अतिशय मोठा वाटा आहे.अनेक महत्त्वाच्या अभ्यासांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
यांमध्ये रक्तवाहिनीसंबंधीच्या भारतीय उपकरणाला सीई चिन्ह मान्यता मिळावी, यासाठीचा करण्यात आलेला अभ्यास समाविष्ट होता. त्यांनी निधी संकलनामध्ये साहाय्य केले व मेडअलायन्स च्या कॉर्डिसमध्ये होणाऱ्या व्यापारी विलीनीकरण प्रक्रियेचे नेतृत्व केले.
सेल्युशन एसएलआर या नावाने प्रसिद्ध असलेले सिरोलिमस औषध-निक्षालन उपकरण (डीईबी) ही मेडअलायन्सची अभूतपूर्व निर्मिती ही यशाचे मूळ ठरली आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा जगातल्या लाखो लोकांच्या आयुष्यावर निश्चितपणे परिणाम होईल.
भारतातील मेदांत हॉस्पिटलच्या हृदय संरचना व शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण चंद्र म्हणाले, की माझा अमित यांच्याशी दोन दशकांहून अधिक जुना परिचय आहे.स्टेंटमुक्त अॅन्जिओप्लास्टीच्या या प्रेरक काळात लाखो रुग्णांना सेवा देण्याची क्षमता असलेले हे क्रांतिकारी तंत्रज्ञान निर्माण करण्यात आणि बाजारात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
सेल्युशन एसएलआरचे भारत, जपान आणि युरोपातील प्रत्यक्ष अनुभव आणि वैद्यकीय निष्कर्ष अतिशय प्रभावी आहेत. हृदयरोग व संबंधित रोगांपासून त्रस्त रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांचा आयाम सकारात्मक दृष्ट्या बदलून टाकण्याची संधी या तंत्रज्ञानामुळे प्राप्त झाली आहे.
मधुमेहाचे १०० दशलक्षहून अधिक रुग्ण असलेला भारत देश आज वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. देशाचे आरोग्य क्षेत्र वेगाने वाढत आहे. यामुळे फक्त आर्थिक वृद्धीलाच चालना मिळते असे नव्हे, तर गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरणही निर्माण होते. हृदयविकाराच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या आपल्या देशातील आरोग्य क्षेत्राच्या वृद्धीची ही पुढची पायरी आहे.
भारतीय वैद्यकीय उपकरण उद्योगाचे मूल्य सध्या ९० हजार कोटी रुपये (११ दशलक्ष अमेरिकन डॉलर) इतके आहे. २०३० पर्यंत त्यात ३.६ लाख कोटी रुपयांपर्यंत (४४ दशलक्ष डॉलर) लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. यातून भारतातील आरोग्य क्षेत्राची अफाट क्षमता व महत्त्व अधोरेखित होते. असे श्री. अमित बोहोरा यांनी आपले मत मांडले
मानवी जीवनमान उंचावण्याचे पवित्र उद्दिष्ट लक्षात घेऊन उत्तमोत्तम उत्पादने वैश्विक स्तरावर उपलब्ध करून दिली पाहिजेत, याची आठवण मेडअलायन्सचे हे अधिग्रहण करून देत राहील. या क्रांतिकारी औषध-निक्षालन फुग्याचे (ड्रग-एल्यूटिंग बलून) विपणन, वितरण, तसेच हे उपकरण जागतिक स्तरावर उपलब्ध करून देण्यामध्ये कॉर्डिस महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची तपासणी उपकरणासाठीची मान्यता मिळवण्याच्या दृष्टीने कंपनीचा प्रवास चालू आहे. लक्षावधी लोकांच्या नजीकच्या भविष्यावर सखोल प्रभाव पडेल, अशा टप्प्यावर ही कंपनी आहे.
0 Comments