अॅनेस्थेशियातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आरोग्य क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरेल ः डाॅ. डी. विवेकानंद
पुणे : आज आरोग्य क्षेत्रात अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान येत असून, हे तंत्रज्ञान मानवी समाजासाठी फार उपयोगाचे ठरत आहे. आरोग्य क्षेत्रात अॅनेस्थेशिसिस्टनी आजवर फार मोलाची भूमिका बजावली आहे. बदलत्या आरोग्य तंत्रज्ञानाच्या धर्तीवर अॅनेस्थेशिया क्षेत्रातही नवनवीन संशोधन येऊ घातले आहे. हे संशोधन आपल्या अॅनेस्थेसियोलाॅजीस्ट ने स्वीकारणे गरजेचे आहे. असे झाल्यासच अॅनेस्थेशियातील अत्याधुनिक तंत्रज्ञान हे आरोग्य क्षेत्रासाठी क्रांतिकारी सिद्ध होईल, असे प्रतिपादन आर्म्ड फोर्सेस मेडिकल काॅलेज पुणेचे डीन मेजर जनरल डाॅ. डी. विवेकानंद यांनी केले.
सोसायटी आॅफ अॅनेस्थेसियोलाॅजीस्ट पुणेच्या वतीने आयोजित अॅनेस्थेसियोलाॅजीस्टची एक राज्यस्तरीय परिषद आयएसएकाॅन महाराष्ट्र २०२३ चे उद्घाटन शुक्रवार ६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात डाॅ. विवेकानंद बोलत होते. या प्रसंगी इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेसियोलाॅजीस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. एम. व्ही. भीमेश्वर, चीफ पेट्रन डाॅ. आनंद भाटिया यांच्यासह आॅर्गनायझिंग चेअरमन डाॅ. एच. के. साळे, को-चेअरमन डाॅ. सरिता स्वामी, डाॅ. शुभांगी कोठारी, सचिव डाॅ. राजेंद्र पाटील, सहसचिव डाॅ. पल्लवी बुटियानी, डाॅ. कल्याणी पाटील, डाॅ. बी. डी. बंडे, डाॅ. अविनाश भोसले, डाॅ. जाॅयशंकर जाना, डाॅ. विकास कर्णे यांच्यासह आयएसए पुणेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व सरस्वती स्तवनाने करण्यात आली. कार्यक्रमात चीफ पेट्रन डाॅ. आनंद भाटिया यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व प्रमुख पाहुण्यांचे या वेळी शाल व पुणेरी पगडी परिधान करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डाॅ. एच. के. साळे यांनी सोसायटी आॅफ अॅनेस्थेसियोलाॅजीस्ट पुणेतर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. डाॅ. साळे म्हणाले की, अशाप्रकारची परिषद घेण्याचा मान पुणे शहराला पहिल्यांदा मिळाला आहे. या माध्यमातून आम्ही आता अॅनेस्थेशिया क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान हे छोटी शहरे व गावखेड्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू. राज्यभरातील हजारो अॅनेस्थेसियोलाॅजीस्टचे ज्ञान संवर्धन व अनुभव समृद्धीसाठी संघटना आगामी काळात प्रयत्न करेल.
कार्यक्रमात बोलताना डाॅ. भीमेश्वर यांनी सोसायटी आॅफ अॅनेस्थेशियोलाॅजीस्ट पुणे या संस्थेशी असलेल्या आपल्या नात्यावर सविस्तर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. कल्याणी पाटील यांनी केले. डाॅ. राजेंद्र पाटील यांनी आयएसएकाॅन महाराष्ट्र २०२३ या परिषदेमागील संकल्पना स्पष्ट केली. डाॅ. पल्लवी बुटियानी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सोहळ्यासाठी डाॅ. संगीता चंद्रशेखर, डाॅ. अभय संचेती, डाॅ. प्रतिभा काणे यांच्यासह सोसायटी आॅफ अॅनेस्थेसियाॅलाॅजीस्ट पुणेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या परिषदस्थळी विविध कंपन्यांनी आपले स्टाॅल्स लावले होते, ज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक अशी उपकरणे ठेवण्यात आली होती. या शिवाय या स्टाॅल्समध्ये काही कलात्मकता दर्शवणारे स्टाॅल्सदेखील लावलेले होते. परिषदेला आलेल्या डाॅक्टरांनी या सर्व स्टाॅल्सवर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या उपकरणांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
0 Comments