20 आॅक्टोबरपासून पुण्यात भव्य `मायटेक्स एक्स्पो`चे आयोजन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर (MCCIA) चा पुढाकार


पुणे : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २९ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (`मायटेक्स एक्स्पो) चे आयोजन शिवाजीनगर येतील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे.

दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, महाराष्ट्र चेंबरचे मायटेक्सचे पुणे विभागाचे मुख्य संयोजक दिलीप गुप्ता, संयोजक विजयकुमार मालपुरे, गोविंद पानसरे, सूरज तामगावे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे आणि  संयोजक दिलीप गुप्ता, माहिती देताना म्हणाले, महाराष्ट्र चेंबर चे  अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मायटेक्स एक्स्पो होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना देणे, प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्यातील व देशातील व्यापारी, उद्योजक या प्रदर्शनात सहभागी होत असून प्रदर्शनात २२५ हून अधिक जणांनी स्टॉलची नोंदणी केली आहे.

प्रदर्शनात विविध नामांकित व्यापारी, उद्योजक, शिक्षण संस्था, कृषी प्रक्रिया उद्योग आदी सहभागी होत आहेत. व्यापार, उद्योग,  कृषी प्रक्रिया उद्योजक, बांधकाम, आयटी, शिक्षण ऑटोमोबाईल, गृहप्रकल्प, सोलार क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील उद्योजकांचा यामध्ये सहभाग आहे. प्रदर्शनात व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगांच्या नवीन संधीसह विविध विषयांवरील परिषदा तसेच व्यवसाय वृद्धीची संधी `मायटेक्स एस्क्पो` द्वारे उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

माणगावे आणि गुप्ता म्हणाले, उद्योजक व्यापारी आणि विशेषतः नवउद्योजकांच्या कलाविष्कारांना चालना देण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने महा एक्सपो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. मुंबईत २०२२ मध्ये आयोजित पहिल्या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर नाशिक येथे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभला.

त्यानंतर पुणे येथे प्रदर्शन भरविले जात आहे. हे प्रदर्शन राज्यातील इतर उद्योजकांसाठी आदर्शवत ठरणार आहे. प्रदर्शनात उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे सर्व समावेशक असे स्टॉल्स आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्यांची उत्पादने, नवोदित उद्योजकांचे नाविन्यपूर्ण कलाविष्कार पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

पदार्थां पासून ते कृषी, पर्यटन, गृहोपयोगी वस्तूंचे आणि नाविन्यपूर्ण कलाविष्काराचे दर्शन घडविणारी उत्पादने, B2B अंतर्गत मोठ्या कंपन्या आणि उद्योजकांमध्ये विचारांची देवाण घेवाण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

प्रदर्शनात महाराष्ट्रा बरोबर गोवा, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश, लेह लडाख, इथून व्यापारी सहभागी झाले आहेत. गुजरात सरकारचे औद्योगिक विस्तार कुटीर, भारत सरकारचा वस्त्र तसेच हस्तशिल्प विभाग, गुजरात सरकारचा गुजरात सरकारचे कुटीर आणि ग्रामीण उद्योग विभाग, भारत सरकारचा राष्ट्रीय ज्युट बोर्ड, राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, स्टेट बँक ऑफ इंडिया, एक्स्पो इंडिया एक्झीबिशन प्रायव्हेट लिमिटेड हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

Post a Comment

0 Comments