* सॅमको सिक्युरिटीजचे एक्झिकेटिव्ह डायरेक्टर, प्रेसिडेंट नीलेश शर्मा यांची माहिती
* सॅम्को सिक्यूरिटिजने बाजारात आणले त्यांचे नवीन वैशिष्ट्य ‘माय ट्रेड स्टोरी’
* पुण्यातील ट्रेडर्सची कामगिरी अजून वृद्धिंगत व्हावी यासाठी प्रयत्न; धोक्याची घंटा : सद्य
बाजार विश्लेषणानुसार
पुणे : पुण्यातील ट्रेडिंगच्या गतिमान जगात एक लक्षात घेण्यासारखी समस्या उभी राहिली आहे. भारतातील एक अग्रगण्य गुंतवणूक टेक कंपनी सॅम्को सिक्यूरिटिजने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षभरात पुण्यातील ६२% ट्रेडर्सची शेअर बाजारातील कामगिरी खालावली आहे. ज्याप्रमाणे ‘माय ट्रेड स्टोरी’ हे वैशिष्ठ्य व्यापाऱ्यांची व्यावसायिक धोरणे सुधरविण्यासाठी आणि अधिक चांगले बाजार परिणाम मिळवण्यासाठी उपयुक्त आहे; त्याचप्रमाणे अजून जास्त प्रगत साधने आणि विश्लेषणात्मक माहितीच्या आधाराने ट्रेडर्सना सक्षम करण्याच्या प्रयत्नांचे महत्त्व ही चिंताजनक आकडेवारी अधोरेखित करते, अशी माहिती सॅमको सिक्युरिटीजचे एक्झिकेटिव्ह डायरेक्टर अॅण्ड प्रेसिडेंट नीलेश शर्मा यांनी दिली.
नीलेश शर्मा पुढे म्हणाले की, सॅम्को सिक्यूरिटिज सीआरपी (कॅपिटल रिसोर्स प्लॅनिंग) ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट केलेले ‘माय ट्रेड स्टोरी’ हे वैशिष्ठ्य नवीन व कल्पक अश्या स्प्रेडशीट आणि विश्लेषणाची साधने यांचा एक एकत्रित संच उपलब्ध करून देते, जेणेकरून ट्रेडर्सना त्यांच्या ट्रेडिंगशी संबंधीत आवश्यक, महत्त्वपूर्ण दृष्टी मिळेल.
ही साधने खास वैयक्तिक ट्रेडिंग प्रोफाइलसाठी त्यांच्या ट्रेडिंगशी संबंधीत सर्वसमावेशक आकडेवारी आणि सखोल विश्लेषण उपलब्ध करून देतात. पोजिशन डिटेल्स, ट्रेड लेग ब्रेकडाऊन, महत्त्वाचे तांत्रिक निर्देशक, नफा आणि तोटा विश्लेषण (P&L) आणि यांसारख्या बऱ्याच महत्त्वाच्या पैलूंचा समावेश करून ‘माय ट्रेड स्टोरी’ हे वैशिष्ठ्य व्यापाऱ्यांना पूर्ण माहितीसह व विचारपूर्वक निर्णय घेण्यास आणि त्यांचे बाजार परिणाम वाढवण्यास मदत करते.
सॅम्को सिक्यूरिटिज सीआरपी (कॅपिटल रिसोर्स प्लॅनिंग) ट्रेडिंग प्लॅटफॉर्म रिअल टाइम मार्केट डेटा, तांत्रिक विश्लेषणाची साधने, मार्जिन ट्रेडिंग, स्टॉप लॉस ऑर्डर्स, आणि अन्य शैक्षणिक संसाधने प्रदान करत असल्याने ते आधीच लोकप्रिय आहे. आता ‘माय ट्रेड स्टोरी’ या नवीन वैशिष्ठ्याला समाविष्ट करून सॅम्को सिक्यूरिटिजने या व्यासपीठाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी, आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आणि आजच्या गतिशील बाजारामध्ये टिकून स्वतःची भरभराट करण्यासाठी मदत करणाऱ्या प्रगत व आधुनिक साधनांची आवश्यकता दाखवून देणारे हे वैशिष्ठ्याने उद्योगक्षेत्रात एक नवीन मानक बनवले आहे.
सॅम्को (SAMCO) समूहाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिमीत मोदी हे ट्रेड स्प्रेडशीट या वैशिष्ठ्याचे महत्त्व अधोरेखित करत म्हणाले, “ज्या बाजारात ६२% ट्रेडर्स खराब कामगिरीच्या समस्येशी झुंजत आहेत तेथे ‘माय ट्रेड स्टोरी’सारखे आमचे कल्पक वैशिष्ठ्य एक मार्गदर्शक म्हणून काम करेल.
ते व्यापाऱ्यांना आपली धोरणे सुधारून अधिक चांगले परिणाम मिळविण्यासाठी वैयक्तीकृत मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने माहिती, विश्लेषण व अंतरदृष्टी देईल. ट्रेड प्रॉबॅबिलिटी सक्सेस स्कोर हा एक अनोखा घटक भूतकाळातील ट्रेडिंगची माहिती, बाजारातील कल, तांत्रिक निर्देशक आणि जोखीम व्यवस्थापनाची धोरणे यांचे मूल्यमापन करून प्रत्येक व्यवहाराच्या यशाच्या संभाव्यतेची शक्यता वर्तवतो. या साधनामुळे ट्रेडर्सना त्यांचे व्यवहार योग्य प्रमाणात ठेवणे, क्षमता ओळखून त्यांचा वापर करणे आणि जास्त यश मिळवणे यासाठी ज्ञानाने सुसज्ज करतो.”
माय ट्रेड स्प्रेडशीट वैशिष्ठ्याचे प्रमुख फायदे :
* पॅटर्न ओळखणे : ट्रेड स्प्रेडशीट भूतकाळातील व्यवहारांवरून फायदेशीर पॅटर्न आणि धोरणे ओळखण्यात मदत करते; ज्यामुळे भविष्यातील व्यापारिक गतीविधींमध्ये त्यांची प्रतिकृती शक्य होऊ शकते.
* पोजिशन सायझिंगचे अनुकूलन : या वैशिष्ठ्याच्या सहाय्याने पोजिशन डिटेल्सचे आणि कामगिरीच्या मेट्रिक्सचे तपशीलवार व बारकाईने विश्लेषण करून ट्रेडर्स प्रभावी जोखीम व्यवस्थापन व अधिक नफ्याच्या हमीसह योग्य पोजिशन साइज मिळवू शकतात.
* शेअर विकत घेण्याची आणि विकण्याची अचूक वेळ : ट्रेड स्प्रेडशीटमधून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे ट्रेडर्सना शेअर कधी घ्यावे व कधी काढावे हे अगदी योग्य ठरवता येते आणि त्यामुळे ट्रेडिंगच्या वेळेची अचूकता वाढते.
* जोखीम-लाभ मूल्यमापन : ट्रेड स्प्रेडशीटमधून मिळालेल्या मार्गदर्शन आणि त्याच्याच बरोबर जास्तीत जास्त संभाव्य नफा आणि तोट्याचे विश्लेषण ट्रेडर्सना जोखीम-लाभ यांच्या गुणोत्तराचे मूल्यमापन करण्यास मदत करते, जेणेकरून ट्रेडर्सना विचारपूर्वक व संपूर्ण माहितीसह निर्णय घेता येतात.
सर्व प्रकारच्या कौशल्य स्तरांवरील ट्रेडर्सना सक्षम करते :
हे ट्रेड स्प्रेडशीट विविध स्तरांवरील व्यापक व अत्यावश्यक माहिती देत असल्यामुळे सर्व टप्प्यातील ट्रेडर्सना सहाय्यक ठरते. याबरोबरच अॅनॅलिटिक्स (विश्लेषण) फिचर बाजारातील कल कसे आहेत याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन करते. ट्रेड प्रॉबॅबिलिटी सक्सेस स्कोर यशाची कमी शक्यता दाखवत असेल तर ट्रेडर्सना अनुभवी निधी व्यवस्थापकांचा सल्ला घेण्यासारख्या पर्यायांचा विचार करण्यास प्रोत्साहित केले जाते.
पुण्यातील प्रत्येक श्रेणीतील माहितीचे विस्तृत सूची खालीलप्रमाणे :
डेरिवेटिव्हज ट्रेडर : १२ महिन्यांचे निरीक्षण केल्यास, या श्रेणीची कामगिरी सर्व कालावधीमध्ये तुलनात्मक रीतीने उच्च स्तरावर राहिली असून १२ महिन्यांमध्ये सर्वाधिक कामगिरी (२४%) पाहिली गेली आहे. मात्र या ट्रेडरला विशेषतः १२ महिन्यामध्ये लक्षणीय अश्या खराब कामगिरीचा (७६%) एक महत्वपूर्ण टप्पा देखील अनुभवास येतो. ट्रेड साइजच्या अनुसार, सरासरी फायदा रु.२०,३५४.७१ एवढा लक्षणीय आहे आणि सरासरी तोटा रु.१३,८३३.१६ एवढा आहे.
हायब्रिड ट्रेडर : दुसरीकडे, या श्रेणीने ६ महिन्यात सर्वोत्तम कामगिरी (६२%) सह सर्व कालावधीमध्ये उत्तम कामगिरीमध्ये सातत्य दाखविले आहे. त्यांची सर्वाधिक खराब कामगिरी ३ महिन्यात पाहण्यात आली असून या ट्रेडरची खराब कामगिरी तुलनेने मध्यम प्रमाणात असते. हा ट्रेडर सरासरी फायदा रु. ८,२५१.६२ मिळवतो तर याचे सरासरी नुकसान रु.७,१९१.७९ आहे.
गुंतवणूकदार : गुंतवणूकदार श्रेणी थोडी जास्त रुढीवादी दृष्टीकोनाची असून ते दीर्घकालीन कालावाधीवर लक्ष केंद्रित करतात. ते १२ महिन्यात सर्वाधिक चांगली कामगिरी (५१%) करतात तर ३ महिन्यात सर्वात कमी कामगिरी (३०%) करतात. सरासरी फायदा रु. १८,४७४.६९ मिळवत असून सरासरी नुकसान रु.२४,२५०.७८ असते. हे फायदा आणि तोटा यामध्ये मोठ्या प्रमाणात असमानता दर्शवते.
ऑप्शन्स ट्रेडर : यांची सर्व कालावधीमध्ये सर्वात कमी कामगिरी असून सर्वाधिक चांगली कामगिरी ३ महिन्यामध्ये (३६%) होते. हे मोठ्या प्रमाणात कमी कामगिरीचा अनुभव घेतात; विशेषतः १२ महिन्यात (८३%). यांचा सरासरी फायदा रु.३,८९५.०२ असून सरासरी नुकसान रु.५,६८८.८६ आहे.
खास प्रास्ताविक सवलत :
‘माय ट्रेड स्टोरी’च्या लॉंचिंगच्या निमित्ताने, ग्राहकांसाठी विशेष सवलत आहे. त्यांना ‘माय ट्रेड स्टोरी’ची उन्नत (अडवांस्ड) वैशिष्ठ्ये पूर्णपणे निःशुल्क मिळतील; ज्यामुळे ग्राहकांना रु.१२,००० चा फायदा होईल. अधिक चांगले परिणाम मिळावे म्हणून योग्य माहितीवर आधारित निर्णय घेऊन व्यवहार करण्यासाठी अतिशय सखोल अंतरदृष्टी व मार्गदर्शन देणाऱ्या या वैशिष्ठ्याचा ट्रेडर्स लाभ घेऊन सक्षम होऊशकतात.
0 Comments