'ॲमेझॉन लोकल शॉप'वर सहभागी होण्यामध्ये पुण्याचे शाॅपमालक अव्वल

ॲमेझॉन इंडियाच्या लोकल शॉप्स विभागाचे प्रमुख अभिषेक जैन यांची

पत्रकार परिषदेत माहिती


पुणे : लोकल शॉप्स ऑन ॲमेझॉन या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन बदल घडवण्यामध्ये पुण्याचा क्रमांक अव्वल आहे. किचन, ग्रोसरी, इलेक्ट्रॉनिक्स, इन्व्हेंटर बॅटरीज, होम फर्निचर आणि इतर अशा अनेक प्रकारांमध्ये पुण्यातील लोकल शॉप मालकांनी ॲमेझॉनच्या लोकल शॉप्स ऑन प्रोग्राममध्ये सहभाग घेतला आहे.

या प्रोग्रामची सुरुवात 2020 मध्ये करण्यात आली होती. आता हा प्रोग्राम 344 शहरातील 3  लाखांहून अधिक रिटेलर्स पर्यंत पोहोचला आहे. हा प्रतिसाद केवळ मेट्रोसिटीमध्ये नाही तर मध्यम आणि छोट्या शहरांतही चांगला प्रतिसाद मिळू लागलेला दिसून येतो आहे. महाराष्ट्राचा विचार करता मुंबई,  पुणे, नागपूर, सातारा आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये लोकल शॉप्स ऑन ॲमेझॉनचे जाळी मोठ्या प्रमाणात वाढले आहे, अशी माहिती ॲमेझॉन इंडियाच्या लोकल शॉप्स विभागाचे प्रमुख अभिषेक जैन यांनी पुण्यात पत्रकारांशी चर्चा करताना दिली.

अभिषेक जैन पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील 35 हजारांहून अधिक दुकानदारांनी या योजनेत सहभाग घेतल्याचे दिसून येते. या लोकल शॉप्स ऑन ॲमेझॉन प्रोग्राममुळे ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेतेही मिळत असून त्यामुळे किचन, कपडे, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, मेजर अप्लायन्सेस, होम आणि फर्निचर अशा विविध वर्गातील उत्पादने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागली आहेत.

अभिषेक जैन

भारतात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. वस्तूंना, उत्पादनांना वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे लोकल शॉप मालकांना आपला व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने वाढवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.  नुकताच साजरा करण्यात आलेल्या ॲमेझॉन प्राईम डेट 2023 मध्ये छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यवसायात मोठी विक्री पहायला मिळाली आहे.  ॲमेझॉन डॉट इन या वेबसाईटवर प्रत्येक सेकंदाला वीस ऑर्डर मिळत होत्या. 90 हजारांहून अधिक छोटे आणि मोठ्या विक्रेत्यांना या ऑर्डर्स मिळाले आहेत.  भारतातील 19000 हून अधिक  पिन कोड असलेल्या ठिकाणी या ऑर्डर्सचा फायदा व्यवसायिकांना झाला आहे.

जैन म्हणाले की,  लोकल शॉप्स ऑन अमेझॉन प्रोग्राममुळे पुण्यात प्रचंड प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येते आणि ते मला खऱ्या अर्थाने प्रेरित करते.  या बदलाचे प्रतिबिंब स्थानिक दुकान मालकांमधील उत्साहातून दिसून येते.  ॲमेझॉनचे विविध टूल्स आणि सहकार्य यांच्या माध्यमातून ऑफलाइनपासून ते ऑनलाईनपर्यंतचा त्यांचा प्रवास हे एक प्रकारे डिजिटल कॉमर्समध्ये अमर्यादित संधी असल्याचे द्योतक आहे.

ऑफलाइन दुकानदारांना ई-कॉमर्स चा फायदा करून देण्याचा आम्हाला अभिमान आहे.  या ई कॉमर्समुळे या छोट्या दुकानदारांना आणि मध्यम आकाराच्या दुकानदारांना त्यांच्या भागात नसलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  या क्रांतिकारी बदलांमध्ये पुणे आघाडीवर आहे.  या डिजिटल युगात स्थानिक व्यवसाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरारी घेत  असताना पाहणे आनंदाचे आहे.

ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांनीही आणि गावोगावच्या दुकानदारांनी डिजिटल व्यवसायिक झाल्याबद्दल तंत्रज्ञानाचे कौतुक केले. पुण्यात संतोष माने यांचे कॅप्टोई नावाचे चपला-जोड्यांचे प्रसिद्ध दुकान आहे. लोकल शॉप्स ऑन अमेझॉन या प्रोग्राममध्ये महाराष्ट्रातील 35000 हून अधिक रिटेलर्स आणि दुकानदार सहभागी झाले आहेत, त्यात संतोष माने यांच्या दुकानाचाही समावेश आहे. 

या उपक्रमामुळे किरकोळ ऑफलाईन विक्रेत्यांनाही ई-कॉमर्स चा फायदा घेता येत आहे. ॲमेझॉन डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून ते डिजिटल माध्यमातून उपलब्ध झाले आहेत आणि त्यामुळे त्यांचा विस्तार वाढला आहे.  ग्राहकांना आता पुण्यातील त्यांच्या विश्वासार्ह आणि आवडीच्या दुकानातून उत्पादने घरी बसून खरेदी करता येऊ लागली आहेत.  छोटे स्थानिक दुकाने आता डिजिटल स्टोअर्स बनली आहेत आणि विक्रेत्यांना त्यांची उत्पादने त्यांच्या भागात नसलेल्या  ग्राहकांनाही विकता येऊ लागली आहेत. त्यांना सेवा देता येऊ लागली आहे.

याशिवाय या स्थानिक दुकानदारांना इझी शिफ्ट आणि सेलर फ्लेक्स अशा विविध ऍमेझॉनच्या योजनांचाही फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात वाढ होऊ लागली आहे.  याचा फायदा केवळ पुण्यात नाही तर देशातील विविध शहरांमध्ये असलेल्या छोट्या दुकानदारांनाही होत आहे, असेही अभिषेक जैन म्हणाले.

Post a Comment

0 Comments