पुणे : ग्राहक-केंद्रित विमा सेवेची कक्षा वाढविण्याच्या दिशेने एक धाडसी पाऊल टाकत, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या लॉर्ड्स मार्क इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा. लिमिटेडने, जीवन विमा, आरोग्य विमा आणि सामान्य विमाविषयक उपापयोजना प्रदान करणारे ‘बिमाकवच’ नावाची नावीन्यपूर्ण डिजिटल व्यासपीठ सुरू केल्याची आज घोषणा केली.
विमा नियामक 'आयआरडीएआय'द्वारे प्रमाणित ‘बिमाकवच’ हे डिजिटल प्लॅटफॉर्म हे नवीनतम सायबर सुरक्षेने सुसज्ज, कडेकोट सुरक्षा परीक्षण पूर्ण केलेले असून, विमा जगतात नव्याने पाऊल टाकणाऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मत प्रदान करेल. हे प्लॅटफॉर्म सर्वसमावेशक विमा संरक्षण शोधणार्यांचे, तसेच शंभरहून अधिक कॉर्पोरेट्सना लक्षावधी किरकोळ ग्राहकांना लक्ष्य करण्याचा त्रास-मुक्त, वापरकर्ता-अनुकूल अनुभव त्याच्या डिजिटल आणि रिटेल शाखांद्वारे प्रदान करेल. याच्या मुख्य सेवांमध्ये विक्री, सल्लामसलत, समुपदेशन आणि कार्यक्षम दावा निवारण आणि त्या प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन ग्राहकांना देणे यांचा समावेश असेल.
लॉर्ड्स मार्क इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक, श्री. राघव संतोष म्हणाले, भारतात, सध्या फक्त ६ टक्के लोकांकडे विमा पॉलिसी किंवा विम्याचे कवच आहे, याचा ९४ टक्के लोक आजही विम्यापासून वंचित राहिले आहे.
विमा पर्यायांबद्दल जागरुकता निर्माण करताना त्यासंबंधाने गैरसमज व अज्ञान दूर करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. मचा धोरणात्मक उपक्रम आणि डिजिटल-सुलभता प्रदान करणाऱ्या ‘बिमाकवच’ या माध्यमामुळे या विशाल संभाव्य बाजारपेठेत प्रवेश करण्याचा आमचा प्रयत्न आहे. योग्य विमा पॉलिसींच्या श्रेणीसह ग्राहकांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करू शकेल, अशा प्रकारचे व्यासपीठ सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे.
नाविन्यपूर्ण पोर्टल, ‘बिमाकवच’ हे साधेपणा, सुविधा आणि सर्वसमावेशक विमा संरक्षणाचे प्रतीक आहे, पोर्टलचे यूपीआय, फोनपे, गुगलपे, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या सारखे अनेकानेक देयक व्यवहाराचे पर्याय हे तितकेच विनासायास आणि वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर आहेत.
हे पोर्टल बेरोजगार किंवा अल्परोजगार असलेल्या व्यक्तींसाठी देखील प्रवेशयोग्य आहे, त्यांना पॉइंट ऑफ सेल पर्सनच्या (पीओसेलपी) भूमिकेद्वारे उत्पन्न मिळविण्याची संधी ते मिळवून देते. हा उपक्रम भारतातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन सामाजिक जबाबदारीच्या आमच्या बांधिलकीशी सुसंगत आहे.
लॉर्ड्स मार्क इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड त्यांच्या पोर्टलच्या वैशिष्ट्यांमध्ये मोफत विमा बातम्या बुलेटिन आणि स्व-जोखीम मूल्यांकन खिडकी समाविष्ट करण्याच्या योजनांसह उत्तरोत्तर आणखी भर घालण्यासाठी कटिबद्ध आहे. प्लॅटफॉर्ममध्ये कंपनी-निहाय आणि उत्पादन-निहाय पॉलिसीची तुलना देखील असेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना जोखीम सुरक्षा कवच आणि किंमतीवर आधारित निर्णय संपूर्ण माहितीनिशी आणि सूज्ञतेने घेता येईल.
नजीकच्या भविष्यात, आम्ही एक मजबूत पत इतिहास असणाऱ्या ग्राहकांना रोखीच्या चणचणीच्या अडचणींचा सामना करावा लागल्यामुळे वेळेवर पॉलिसीचे नूतनीकरण किंवा खरेदी करणे शक्य बनत नाही, अशा लोकांसाठी विमा हप्त्यांसाठी पतपुरवठ्याचा (प्रीमियम फंडिंग) पर्याय देखील सादर केला जाणार आहे.
टर्म इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, व्हेईकल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, मरीन अँड हल इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स, कॉन्ट्रॅक्टर ऑल रिस्क कव्हर आणि इतर दायित्वे विमा यांसारख्या श्रेणींमध्ये विमा सेवा प्रदान करण्यात कंपनीचे कौशल्य आहे. ग्रामीण भागात विमा संस्कृती रुजवण्यासाठी पीक विमा, गुरांचा विमा यांसारख्या कृषी विम्यासाठी तिचे एक वेगळे अंगही काम करत आहे.
0 Comments