युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी ऋत्विक धनवट यांची निवड


पुणे - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नुकतेच राज्यात सहा झोननिहाय प्रमुख तथा समन्वयक घोषित केले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र झोनच्या समन्वयकपदी संघटनेत सचिव म्हणून कार्यरत असलेले ऋत्विक औदुंबर धनवट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऋत्विक धनवट यांची ही नियुक्ती युवक काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक उदयभान चिब व उपनिरीक्षक एहसान खान, कुमार तसेच प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी एकमताने केली. 

ऋत्विक धनवट यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र महासचिवपदी अक्षय जैन यांचीही नियुक्ती करण्यात आील आहे. 

ऋत्विक धनवट हे गेल्या अनेक वर्षांपासून युवक काँग्रेसच्या संघटनेत कार्यरत असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. ऋत्विक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मिळून यापूर्वी एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन, तसेच वारीच्या दरम्यान वारकऱ्यांना विविध प्रकारची मदत दिलेली आहे. या आंदोलनात्मक व सामाजिक कार्यांमुळेच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

यापुढील काळात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात युवक काँग्रेसला मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया ऋत्विक यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments