पुणे निमा अध्यक्षपदी डॉ. अजिंक्य तापकीर यांची बिनविरोध निवड

बुलढाण्यात राज्य बैठकीत केंद्रीय व राज्य कार्यकारणीच्या उपस्थितीत

निवडणूक समितीकडून घोषणा



पुणे : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या डॉक्टरांच्या देशव्यापी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अजिंक्य तापकीर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. बुलढाणा येथे नुकतीच निमा संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीत उत्साहात पार पडली.

या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, माजी अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी, सचिव डॉ. मोहन येंडे, कोषाध्यक्ष डॉ. सोपान खर्चे यांच्यासह निमाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष व निवडणूक समितीचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल शर्मा व सदस्य डॉ.गिरीश डागा यांच्या हस्ते त्यांच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

डॉक्टरांना प्रॅक्टिस मध्ये येणारे विविध अडचणी, बॉम्बे नर्सिंग होम मधील जाचक अटी, डॉक्टर वरील हल्ले तसेच डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.अजिंक्य तापकीर यांनी यावेळी सांगितले.

निमा पुणे जिल्हा बिनविरोध विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे- डॉ. अजिंक्य तापकीर (अध्यक्ष), डॉ. दुर्गेश सोनवणे (सचिव),डॉ.राकेश कंद (कोषाध्यक्ष),डॉ. संगीता खेनट, डॉ.हेमंत दातखिळे ( उपाध्यक्ष),डॉ. श्रीराम जोशी (संघटक ), डॉ. कुलभूषण शितोळे, डॉ.देवेंद्र नहार (सहसचिव),

डॉ. हेमंत काटे, डॉ. इकबाल चौधरी (उपसचिव), तसेच कमिटी मेंबर म्हणून डॉ.पवन सोनवणे, डॉ.संतोष काळे, डॉ.विशाल साठे, डॉ. जांबुवंत भोसले, डॉ.विशाल गोसावी, डॉ.सुनील शिंदे तर निमा पुणे वुमन्स फोरमच्या अध्यक्षपदी डॉ. सायली सातव, सचिव डॉ. कांचन साठे, कोषाध्यक्ष डॉ.सोनाली नरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल डाॅ. अजिंक्य तापकीर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments