होमिओपॅथी तज्ञ रुपाली वायदंडे यांनी मुलांच्या आरोग्याविषयी केले मार्गदर्शन
पुणे : धानोरी परिसरातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डाॅ. रुपाली वायदंडे यांची गुड पेरेंटिंग कार्यशाळा नुकतीच प्राॅक्झिमा इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
आदर्श पालकच उद्याचे आदर्श नागरिकदेखील घडवू शकतात, त्यामुळे आदर्श पालक घडवण्याच्या उद्देशाने डाॅ. रुपाली वायदंडे गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचा पहिला भाग नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला प्राॅक्झिमा स्कूलच्या प्राचार्य रश्मी मॅडम, परेश गांधी यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेत डाॅ. वायदंडे यांनी या कार्यशाळेत ० ते ५ वयोगतील मुलांचे पालनपोषण करताना काय काळजी घ्यावी व कशाप्रकारे मुलांचा सांभाळ करावा, मुलांचा आहार कसा असावा, त्यांचे भरणपोषण कसे करावे, तसेच मुलांची शारीरिक व मानसिक जडणघडण याविषयी सविस्तर मार्गदर्शन दिले. आदर्श पालकत्व कसे असावे, यासंदर्भात डाॅ. रुपाली वायदंडे यांनी माहिती दिली.
या वेळी उपस्थित पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर डाॅ. रुपाली यांनी उत्तर देऊन त्यांचे समाधान केले. यानंतर डाॅ. रुपाली यांनी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, त्यांच्या मेदूची कार्यपद्धती कशी वृद्धिंगत करावी यासंदर्भात माहिती देऊन उपस्थित पालकांचे प्रबोधन केले. कार्यशाळेनंतर उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले.
0 Comments