L&T फायनान्सला २०२३ -२४ च्या पहिल्या तिमाहीत ५३१ कोटींचा करोत्तर नफा


पुणे : अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या आणि ग्राहक-केंद्रित, उच्च श्रेणीची, डिजिटल-सक्षम रिटेल एनबीएफसी बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडने (एलटीएफएच) जून २०२३ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत ५३१ कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा (एकत्रित) नोंदविला आहे. गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने करोत्तर नफ्यात १०३ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.

एकूण कर्जवाटपात रिटेल कर्जाच्या पोर्टफोलिओचे प्रमाण ८२ टक्के गाठताना कंपनीने लक्ष्य २०२६ मिशनमध्ये निश्चित केलेल्या ८० टक्के रिटेल कर्जाच्या उद्दीष्टापेक्षा अधिक उद्दीष्ट साध्य केले आहे. लक्ष्य २०२६ योजनेतील बहुतांश उद्दीष्टे हे तीन वर्ष अगोदरच पुर्ण करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. 

कंपनीने ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत ११ हजार १९३ कोटी रुपयांचे रिटेल कर्जवाटप केले असून त्यात मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत २५ टक्के वाढ झाली आहे. रिटेल विभागात विविध प्रकारच्या कर्जातील बळकट वाढीचे पाठबळ मिळाले आहे. रिटेल कर्जाची रक्कम आता ६४ हजार २७४ कोटी रुपयांवर झेपावली असून ३० जून २०२२ अखेरच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात ३४ टक्के वाढ झाली आहे. 

एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ दिनानाथ दुभाषी म्हणाले, वित्तीय वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ८२ टक्के रिटेल कर्जाचे उद्दीष्ट साध्य केले, हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

ग्राहकांच्या बहुतांश गरजांची पूर्तता करताना त्यात सातत्याने नवनवीन आकर्षक फिचर्सची भर टाकली जात आहे. यापुढे वाटचाल करताना आम्ही आमची वाढीची गती कायम राखूच, परंतु त्याचबरोबर ग्राहककेंद्रीत आणि सातत्यपूर्ण फिनटेक स्केल बनण्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू. 

एलटीएफएचने ३० जून २०२३ अखेरीच्या तिमाहीत रिटेलच्या सर्व प्रकारात जोरदार वाढ साध्य केली आहे. ३० जून २०२३ अखेरच्या तिमाहीत चार हजार ५११ कोटी रुपयांचे ग्रामीण समूह कर्ज आणि सूक्ष्म कर्ज वितरण हे या कर्जाचे तिमाहीतील उच्चांकी वितरण ठरले आहे.

त्यात वार्षिक १८ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. कर्ज वितरणापासून वंचित बाजारपेठांतील भौगोलिक भागामध्ये कंपनीची खोलवर मुसंडी, उच्च दर्जाच्या कर्जदारांचे सुदृढ प्रमाण तसेच ग्राहक सक्षमरित्या टिकवून ठेवल्यामुळे व्यवसायाला हातभार लागला आहे. ग्रामीण भागातील व्यवसायाकरिता मालमत्तेच्या आधारावर कर्ज यासाठी राबविलेला रुरल लॅप हा पायलट प्रकल्प तमिळनाडूत मदुराई भागात सुरु करण्यात आलेला आहे.

कृषी अवजारांसाठीच्या वित्तसहाय्यात यंदाच्या तिमाहीत वार्षिक तुलनेत १५ टक्के वाढ होऊन ते ३० जून २०२३ ला संपलेल्यया तिमाहीत एक हजार ७५७ कोटी रुपयांवर झेपावले आहे. कृषीच्या उत्पादकतेत वाढ, किसान सुविधा टॉप-अप आणि रिफायनान्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या संख्येतील वाढ यामुळे या व्यवसायात वृध्दी दिसून आली आहे. 

दुचाकीसाठी वित्तसहाय्यातील वितरणात ३० जून २०२३ ला संपलेल्या तिमाहीत वार्षिक १४ टक्के वाढ होऊन ते एक हजार ७२६ कोटी रुपयांवर गेले आहे. नवीन उपक्रमांद्वारे वितरकांचे मजबूत जाळे तयार करताना कंपनी संकलन नेतृत्व वितरणावर लक्ष केंद्रित करत आहे. कर्ज परतफेडीची दर्जेदार प्रोफाइल असलेल्या ग्राहक वर्गाला अधिकाधिक सेवा देण्यासाठी कंपनीने या व्यवसाय विभागात सेंटम आणि व्हीआयपी प्रो ही दोन नवीन वित्तप्रकार आणले आहेत. 

पोर्टफोलिओचा दर्जा टिकवून ठेवत ग्राहक कर्ज वितरणात नवीन उंची गाठताना कंपनीने ३० जून २०२३ च्या तिमाहीत एक हजार १६२ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. गतवर्षी याच कालावधीत कंपनीने एक हजार १० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले होते. 

गृहकर्ज आणि मालमत्तेवर कर्ज या प्रकारातसुध्दा ३० जून २०२३ च्या तिमाहीत वाढीचा वेग कायम राखताना त्यात वाषिक ३९ टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनीने या प्रकारात एक हजार २९९ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे.

एसएमई विभागातसुध्दा जबरदस्त वाढ नोंदविली गेली असून ३० जून २०२३ ला संपलेल्या तिमाहीत ६०७ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६८ कोटी रुपयाचे कर्ज वितरीत केले होते. हा कर्जप्रकार सुरु केल्यापासून यंदाच्या तिमाहीपर्यंत दोन हजार कोटी रुपयांचे एकूण वितरण झालेले आहे.

अधिकाधिक भौगोलिक भागात शिरकाव करण्याबरोबरच डिजीटलवर भर तसेच वितरकांचे जाळे विस्तारण्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रीत केल्याने या कर्जवितरणात वाढ झाली आहे. 

Post a Comment

0 Comments