MIT-ADT मध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती

अमली पदार्थविरोधी पथक व विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम


पुणे - लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात गुरुवार 27 जुलै रोजी अमली पदार्थांचे दुष्परिणाम या संदर्भात एक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास व कल्याण समितीच्या पुढाकाराने पार पडलेल्या या शिबिरात पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन दिले. या शिबिराचा आम्हाला मोठा लाभ झाल्याची प्रतिक्रिया शिबिरानंतर विद्यार्थ्यांनी दिली.

या मार्गदर्शन सत्रात अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस उनपिरीक्षक दिगंबर चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घुले यांच्यासह हेडकाॅन्स्टेबल रवींद्र रोकडे, काॅन्स्टेबल जगदाळे उपस्थित होते. विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डाॅ. मंगेश कराड यांच्या निर्देशानुसार आयोजित या शिबिराला वतीने विंग कमांडर मोहन मेनन, काॅम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागाचे डाॅ. गणेश पाठक उपस्थित होते. विद्यार्थी विकास व कल्याण समितीचे प्रमुख प्रमुख प्रा. डाॅ. सुराज भोयर यांनी या उपक्रमाचे सुरेख आयोजन केले.

या शिबिरात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून कायमस्वरूपी दूर राहण्याची शपथ घेतली. या उपक्रमासाठी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही चांगले सहकार्य लाभले.

युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून सशक्त भारत बनवावा : पीएसआय चव्हाण

या शिबिरात उपस्थि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देताना दिगंबर चव्हाण म्हणाले की, अमली पदार्थांमुळे आजवर अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. अनेकांचे कुटुंबदेखील उद्ध्वस्त झालेले आहे. या स्थितीत विद्यार्थ्यांनी स्वतः अमली पदार्थांपासून दूर राहून इतरांमध्येही त्याबाबत जनजागृती करावी व एक सशक्त युवकांचा देश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. 

एमआयटी-एडीटीत स्थापन केला अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स - प्रा. डाॅ. सुराज भोयर

यावेळी बोलताना डाॅ. सुराज भोयर यांनी सांगितले की, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डाॅ. मंगेश कराड हे नेहमीच विद्यापीठात नशामुक्ती उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन देत असतात. त्यांच्याच मार्गदर्शनात विद्यार्थी विकास व कल्याण समितीच्या पुढाकाराने एक टास्क फोर्सची स्थापना केली असून, या अंतर्गत गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने अमली व नशाविरोधी पदार्थांच्या दुष्परिणामांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

तसेच विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी अमली पदार्थांपासून दूर रहावेत व त्यांच्यात जनजागृती व्हावी, यासाठी ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग, तसेच सायकलिंग व विविध प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जात आहेत.  याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची तसेच इतर विद्यार्थी व युवकांना अमली पदार्थांचे सेवन करू नये, यासाठी जनजागृती करण्यात येईल, अशी शपथ घेतली. 

Post a Comment

0 Comments