पुणे : पुण्यातील स्वाती गायकवाड यांना सुपरग्लोबल इंटरनॅशनल मिस इंडियाचा किताब पटकावला आहे. फ्लेम फायर मीडिया प्रोडक्शनच्या वतीने गोवा येथील साईराज बीच रिसॉर्ट मध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. स्वाती गायकवाड या पुण्यामध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीस आहेत.
या स्पर्धेत पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर, नोएडा, कोलकाता, केरळ, आसाम सह दुबई, रशिया, कुवैत, इंडोनेशिया, अमेरिका मधील मॉडेलने स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेच्या ज्युरी म्हणून पूनम राऊत, झाहीरा शेख, वर्षा असालकर यांनी काम पहिले. मिस मिसेस आणि किशोर अशा तीन गटात हि स्पर्धा पार पडली. सुरजया मोनी डोलोई या कार्यक्रमाचे आयोजक होते.
मूळच्या मध्ये प्रदेशमधील ग्वालेर येथे स्वाती यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच स्वाती यांना मॉडेलींग आणि फॅशन इंडस्ट्रीविषयी आकर्षण होते. त्यांच्या या आकांशा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आई मोहिनी गायकवाड यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. भविष्यात जागतिक स्पर्धेत भारताला प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असल्याचे स्वाती यांनी सांगितले.
0 Comments