मुंबई : १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन ते ३० मे सीटू स्थापना दिन दरम्यान जनजागृती मोहिमेच्या निमित्ताने नुकताच एन्सा हटमेंटस, सीएसटी, मुंबई येथे मुंबई महानगरपालिका विभाग अंतर्गत आरोग्य सेवेचे काम करणाऱ्या आशा वर्कर्सचा मेळावा संपन्न झाला.
मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी आरमायटी इराणी यांनी पुढाकार घेतला. मेळाव्यात अनेक आशांनी आपल्या व्यथा मांडल्या. या सर्व मुद्द्यांवर महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या महासचिव पुष्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आशांनी आपले प्रश्न कसे सोडवावेत याबद्दल माहिती दिली.
सीटू राज्य उपाध्यक्षा शुभा शमीम यांनी कामगार दिन व सिटू स्थापना दिनाच्या इतिहासाबाबत माहिती दिली व आशा व तमाम कामगार वर्गाचे शोषण नष्ट करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याचे आवाहन केले.
आशा फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी मार्गदर्शन केले. आपल्या संघटनेची ताकद मजबूत करून आशांच्या शोषणाविरुद्ध लढण्याचा निर्धार करून घोषणांच्या गजरात मेळाव्याचा समारोप करण्यात आला.
0 Comments