राष्ट्रीय महत्वाच्या संशोधन संस्था आणि उद्योगांना भेटी
पुणे : डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी (आंबी,पुणे) च्या 'स्कुल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी'च्या विद्यार्थ्यांसाठी 'इस्रो' सारख्या राष्ट्रीय महत्वाच्या संशोधन संस्था आणि उद्योगांना भेटीचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
यू.आर.राव सॅटेलाईट सेंटर ऑफ इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन (ईस्रो),हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड(एच.ए.एल.),भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड(भेल),कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कार्पोरेशन(केसिक) या उद्योग आणि संशोधन संस्थांना त्यांनी भेटी दिल्या.
उत्पादन प्रक्रिया,व्यवस्थापन,कामकाज आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली तसेच तेथील अधिकारी,शास्त्रज्ञांशी संवाद साधला.या संस्थांचा प्रेरक इतिहास,आजचे वर्तमान आणि उद्याचे तंत्रज्ञान समजून घेतले.दि.११ ते १६ मे दरम्यान आयोजित या अभ्यास दौऱ्यात एकूण ९९ विद्यार्थी,५ प्राध्यापक सहभागी झाले.
त्यात संगणक शास्त्र,इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग,माहिती तंत्रज्ञान,मेकॅनिकल इंजिनियरिंग या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. डॉ.अझीम शेख,प्रा.हिमांशू अहिरे,प्रा.अनिल राक्षे,प्रा.दीपाली खैरनार,प्रा.माधवी पाटील यांनी संयोजन केले.कुलगुरू डॉ.सायली गणकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
0 Comments