पोटविकार व यकृत विकारासंबंधी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद


पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे पोट विकार, यकृत यासह महत्त्वाच्या अवयवांसंदर्भातील उपचार व शस्त्रक्रीयासंबंधी माहिती संदर्भात नामांकीत पोट विकार व यकृत विकार तज्ज्ञांच्या उपस्थितीत कॉन्फरन्स संपन्न झाली.

आयएमए पुणे आणि नेक्स्टजेन जीआय सेंटरच्या सहकार्याने पुणे शहरातील स्वारगेट येथील डॉ. के. एच. संचेती सभागृह, आयएमए हाऊस, टिळक रोड येथे ही काॅन्फरन्स झाल्याची माहिती नेक्स्टजेन जीआय सेंटरचे संस्थापक संचालक व भारती विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर डॉ. दादासाहेब मैंदाड यांनी दिली.

यापरिषदेत ३५० पेक्षा जास्त डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. तसेच या परिषदेमध्ये पोट यकृत आणि स्वादुपिंड यावरील विविध आजार, निदान व आधुनिक तंत्रज्ञान यावर विस्तृत स्वरूपात चर्चा करण्यात आली .

या कॉन्फरन्स मध्ये आतड्यातील जळजळीची लक्षणे, यकृत प्रत्यारोपणासाठी कधी काम करावे, विघटित यकृत रोग, एंडोस्कोपीमध्ये प्रगती, लहान आतड्याचा अतिसार, लहान आतड्याच्या जखमांचे मूल्यमापन यासह इतर बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. दादासाहेब मैंदाड यांच्यासह भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. संजय ललवाणी, आयएमएचे एक्झिक्यूटिव्ह ट्रस्टी डॉ. संजय पाटील, आयएमएचे प्रेसिडेंट डॉ. राजीव वरीयानी, सचिव डॉ. गीतांजली शर्मा, जहांगीर हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. परिमल लवाटे, पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटचे प्रतिथयश गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. विनय थोरात,  आयएमएचे सेक्रेटरी डॉ. केदार पाटील, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे डॉ. अमोल बापये, डॉ. अविनाश भुतकर चेअरमन ट्रस्ट बोर्ड आयएमए पुणे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments