`आयुशक्ती`चे पुण्यातील पहिले आरोग्य केंद्र सुरू


पुणे : जगभरातील आघाडीच्या आणि सर्वात विश्वासार्ह आयुर्वेदिक आरोग्य केंद्रांपैकी एक असलेल्या आयुशक्तीने पुण्यात आपले पहिले केंद्र उघडले आहे. पुणे महानगरपालिकेचे मुख्य लेखापरीक्षक अंबरीश गालिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप गालिंदे आणि आयुशक्तीच्या टीमच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आता आयुशक्तीची संपूर्ण महाराष्ट्रात एकूण २० केंद्रे झाली आहेत.

हे नवीन सुरू झालेले केंद्र हे प्रो-आय बिझनेस सेंटर, पहिला मजला, टाटा मोटर्सच्या वर, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर येथे असून येथे ग्राहकांना सर्वसमावेशक अनुभव देण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथील ४ उपचार कक्ष, २ कन्सल्टेशन एरियाज, एक पॅन्ट्री आणि आरामदायी वेटिंग एरियासह आयुशक्ती ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना प्राचीन अशा आयुर्वेदिक उपचार पुरवून त्यांच्या समस्या मुळापासून घालविण्यासाठी सज्ज आहे.

पंचकर्म, स्टीम, मसाज, डिटॉक्सिफिकेशन उपचार, गहन नाडीपरीक्षा, प्रभावी वनौषधी उपचार, वैयक्तिक आहार योजना,मर्म (आयुर्वेदिक प्रेशर पॉइंट) तंत्र यांसारखे उपचार या केंद्रात मिळत राहतील.

या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना सह-संस्थापिका डॉ. स्मिता पंकज नारम म्हणाल्या, “या वर्षाच्या सुरुवातीपासूनचे हे आमचे तिसरे उद्घाटन आहे. आमची स्वप्ने आणि वाढीच्या योजना साकार करण्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या आमच्या ग्राहक, भागीदार, डॉक्टर आणि संपूर्ण टीमचे आम्ही अत्यंत आभारी आहोत.”

“आयुर्वेदाची आणि बरे होण्याची मागणी लोकांमधून वाढत आहे. त्यामुळे अनेक टचपॉइंट्स आणि परिसरांमध्ये उपस्थित राहण्याची गरज आम्हाला माहीत आहे जेणेकरून ग्राहक जास्त प्रवास न करता आमच्यापर्यंत पोचू शकतील.

महाराष्ट्र हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रदेश असून आता आमच्याकडे राज्यभरात २० केंद्रे आणि फ्रँचायझी आहेत.आमच्या विस्ताराच्या योजनांनुसार पुढे जात असताना येत्या काही महिन्यांतील आमच्या पुढील वाढीच्या योजनांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत”, असे त्या पुढे म्हणाल्या.

सामुदायिक आरोग्यामध्ये दीर्घकाळ टिकणारे परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने १९८७ मध्ये आयुशक्तीची स्थापना करण्यात आली. हे मास्टर हीलर दिवंगत डॉक्टर पंकज नारम आणि त्यांच्या पत्नी स्मिता नारम यांनी एकत्रितपणे त्याची स्थापना केली होती.

Post a Comment

0 Comments