पुणे : धनकवडी येथील डॉ. रिता मदनलाल शेटीया यांना पुणे, गुलटेकडी येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची अर्थशास्र् या विषयातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. 'अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड ऑफ इंडिया अमंग द ब्रिक्स कन्ट्रीज (२००६ - २०१७) ' हा त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. ज्योती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील अर्थशास्र् विभाग प्रमुख डॉ. प्रवीण जाधव आणि डॉ. निलेश लिंबोरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. सकाळ इंडिया फाउंडेशन, सी. ए. सुरेश रानडे, आर. बी. आय. च्या सेवानिवृत्त अधिकारी सुहासिनी ताई बिवलकर, निवेदिता माझिरे, डॉ. योगेश कुमार, पदमश्री लीला पुनावाला आणि फिरोझ पूनावाला यांचे सहकार्य लाभले.
वेळोवेळी प्रेरणा, मार्गदर्शन, साहाय्य, सहकार्य आणि खंबीरपणे डॉ. रिता यांच्या पाठीशी उभी राहिली त्यांची आई एच. सी. डॉ. सविता मदनलाल शेटीया आणि त्यांचे स्व. वडील मदनलाल शेटीया यांचे आशीर्वाद या सगळ्यांच्या मार्गदर्शनानेच हा टप्पा मी पार करू शकले. या सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद ! डॉ. रिता यांनी त्यांची हि पीएचडी पदवी त्यांच्या आई - वडिलांना समर्पित केली.
0 Comments