महाराष्ट्रदिनी मोठ्या उत्साहात पार पडली `गर्जा महाराष्ट्र माझा` स्पर्धा

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऋत्विक धनवट यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन


पुणे : महाराष्ट्र दिन म्हणजे १ मे रोजी मुलांसाठी ॲानलाईन फोटो व वक्तृत्व स्पर्धेच आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऋत्विक धनवट यांच्यातर्फे करण्यात आले होते.

स्पर्धेनंतर विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हा बक्षीस वितरण समारंभ महात्मा गांधी भवन मुंबई येथे पार पडला. या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसचिव व युवक काँग्रेसचे  राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लवारू व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी मितेंद्र सिंग व सहप्रभारी प्रदीप सिंधव यांनी स्पर्धकांना महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यातून भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या सोहळ्यास युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, सरचिटणीस व पुणे शहर प्रभारी विजयसिंह चौधरी,पुणे युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहूल शिरसाट उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती व संयुक्त महाराष्ट्राचा लढा युवा पिढीला कळावा हा हेतू ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक ऋत्विक धनवट यांनी दिली.

Post a Comment

0 Comments