वासंतिक चंदन उटीनिमित्त दत्तमंदिरात भजनसंध्या

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन


पुणे : ज्ञानियांचा राजा गुरु महाराव...विठू माऊली तू... अशा विविध अभंगांच्या गजरात दत्तमहाराजांच्या मूर्तीला चंदन उटीचा लेप लावण्यात आला. टाळ-मृदुंगांचा गजर आणि मोग-याच्या सुवासिक फुलांचा गंध अशा वातावरणात भारतीय वारकरी मंडळाने सादर केलेल्या भजनांनी दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे वासंतिक चंदन उटीनिमित्त भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल यांसह ज्ञानदेव म्हणजे विठोबा आमचा पाठीराखा... या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाला पुणेकरांनी टाळयांच्या गजरात साथ दिली. तर तुकाराम तुकाराम नाम घेता... यांसारखे अभंग आणि दत्तनामाचा गजर करताना उपस्थितांमध्ये भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.

अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, दत्तमंदिरात वासंतिक चंदन उटीचे दरवर्शी आयोजन केले जाते. यानिमित्ताने भारतीय वारकरी मंडळातर्फे भजनाच्या कार्यक्रम देखील घेण्यात आला. भारतीय वारकरी मंडळाच्या वारक-यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन  सादरीकरण केले.

Post a Comment

0 Comments