`बाबा तू न जा` म्युझिक अल्बम सॉंगचे पुण्यात लॉन्चिंग संपन्न

ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांच्यावर चित्रित आहे म्युझिक अल्बम 


पुणे : आपल्या लेकींच्या प्रेमाखातर अत्यंत काबाड कष्ट करून त्यांना शिक्षण देऊन स्वावलंबी केलेल्या पुणे महानगरपालिका  कामगार युनियनच्या पाच व्यक्तींचा त्यांच्या लेकींसह नवी पेठ येथील पुणे श्रमिक पत्रकार भवन च्या सभागृहात कामत सोशल फाऊंडेशन तर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

निमित्त होतं `बाबा तु न जा..` या कामत सोशल फाऊंडेशन निर्मित  लेखिका, सायकोलॉजिस्ट व गायिका डॉ.नेहा कामत यांच्या वडील आणि मुलगी यांच्यातील नाते अधोरेखित करणाऱ्या म्युझिक अल्बम आमच्या लॉन्चिंगचे.

सुप्रसिध्द अभिनेते माधव अभ्यंकर व डॉ. नेहा कामत यांनी अभिनय केलेल्या बाबा तू न जा.. या म्युझिक अल्बम सॉंगचे लाँचिंग अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे  अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ. रवी चिटणीस, ज्येष्ठ अभिनेते   माधव अभ्यंकर, आयडीएफसी बँकेचे व्यवस्थापक स्वप्निल जोशी, भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डॉ. गजानन माळी, शिक्षणतज्ञ एम एम नावंदे, म्युझिक अल्बम साँगचे दिग्दर्शक विशाल दिलीप राजहंस , म्युझिक अल्बमच्या गायिका डॉ.नेहा कामत व मुख्य कलाकार उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात मनीषा गिराम यांच्या गणेश वंदनेच्या नृत्याने झाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

आई चे स्थान मुलांच्या आयुष्यात सर्वोच्च असतेच तसेच वडिलांचे असते. आदरयुक्त भीती मुळे कधी कधी मनात असून ही वडिलांशी संवाद होऊ शकत नाही आणि या गोष्टी ची जाणिव तेव्हा होते जेव्हा ते आपल्या पासून कायमचे दूर जातात त्यामुळे नंतर खंत करीत बसण्या पेक्षा मनात येताच क्षणी वडिलांशी संवाद साधला पाहिजे असे मत गायिका, निर्माती आणि अभिनेत्री डॉ. नेहा कामत यांनी व्यक्त केले.

लॉन्च करण्यात आलेले गीत डॉ. नेहा  व त्यांच्या वडिलांच्या नातेसंबंधांवर आधारित असून वडिलांच्या स्मरणार्थ कामत सोशल फाऊंडेशनच्या वतीने पाच पुणे मनपा कामगार युनियन च्या व्यक्तींचा यावेळी त्यांच्या कन्येसह सत्कार करण्यात आला.

यामध्ये पुणे महानगरपालिकेचे कचरा मोटार बिगारी व पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे जॉईंट सेक्रेटरी  मधुकर नरसिंगे व त्यांची मुलगी मयुरी नरसिंगे, पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सेवक जहांगीर पठाण व त्यांची मुलगी सलमा पठाण,

पुणे महानगरपालिकेचे झाडू वाला कर्मचारी संतोष चव्हाण व त्यांची मुलगी  नीलम चव्हाण, पुणे महानगरपालिकेच्या हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे बिगारी तानाजी रिकिबे व त्यांची मुलगी निकिता रिकिबे, पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त सफाई कर्मचारी सेवक पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे माजी कार्याध्यक्ष  प्रकाश चव्हाण व त्यांची मुलगी प्रीती चव्हाण  या वंचित घटकातील व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मधुकर नरसिंगे हे कामगार युनियन चे सह सचिव असून मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी सर्व कामगारांच्या वतीने व्यक्त केले.या कार्यक्रमात गायिका वंदना ढाके यांनी वडील व मुलीच्या नात्यावर आधारित गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नेहा कामत यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रशांत निकम यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कीर्ती जाधव व कामत सोशल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी   विशेष परिश्रम घेतले.हा कार्यक्रम कामत सोशल फाउंडेशन व विध्यांकुर एज्युकेशन यांच्या विशेष सहकार्याने संपन्न झाला.

विध्यांकुर एज्युकेशन तर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी  मानसोपचारावर व्याख्याने , कार्यशाळा व शॉर्ट टर्म कोर्सेस घेतले  जातात.हे म्युझिक अल्बम साँग विध्यांकुर एज्युकेशनच्या यूट्यूब चैनल वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.या कार्यक्रमासाठी लॉन्चिंग पार्टनर आयडीएफसी बँक ,सोल रूट माइंड स्पा  क्लिनिक व प्रतीक पै प्रारंभ  ट्युटोरियल्स डोंबिवली हे होते.


Post a Comment

0 Comments