‘वी’ ने प्रीपेड युजर्सना दिले विशेष आमंत्रण

फक्त ९९ रुपयांमध्ये नेटवर्कमध्ये येण्याची आणि एंट्री लेव्हलला सर्वोत्तम

मूल्य लाभ मिळवण्याची संधी



पुणे : आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वी ने महाराष्ट्र आणि गोव्यातील आपल्या युजर्सना फक्त ९९ रुपयांमध्ये नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण दिले आहे. 

संपूर्ण भारतभर ९९ रुपयांच्या सहज परवडण्याजोग्या किमतीला एंट्री लेव्हल रिचार्ज प्रस्तुत करणारा वी हा एकमेव ब्रँड आहे.  यासाठी वी ने नवे क्रिएटिव्ह कॅम्पेन सुरु केले आहे, यामध्ये मोबाईल फोन युजर्सना 'स्विच टू वी' अर्थात वी नेटवर्कमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे.  फक्त ९९ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी फुल टॉकटाइम व २०० एमबी डेटा वी देत आहे.

मूल्याबाबत विशेष जागरूक असलेल्या युजर्सना अतिशय वेगवान वी नेटवर्कमध्ये येण्याचे आमंत्रण देताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे महाराष्ट्र व गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री. रोहित टंडन यांनी सांगितले की, `वी`मध्ये आम्ही सर्व स्तरांमधील मोबाईल युजर्सच्या गरजा व महत्त्वाकांक्षा समजून घेतो. लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवस्थापनामध्ये अखंडित नेटवर्क कनेक्टिव्हिटी किती महत्त्वाची आहे हे आम्हाला ठाऊक आहे.

या एंट्री लेव्हल रिचार्ज पॅकमधून सर्वात आकर्षक किमतीला श्रेणीतील सर्वोत्तम मोबाईल सेवा प्रस्तुत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र व गोव्यातील मोबाईल युजर्स व नॉन-युजर्स फक्त ९९ रुपयांमध्ये वी नेटवर्कमध्ये सहभागी होऊन सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल कनेक्टिव्हिटीचे लाभ मिळवू शकतात.

या ऑफरमधून आम्ही सर्वसमावेशकतेला चालना देऊ इच्छितो तसेच जास्तीत जास्त युजर्सना सदैव कनेक्टेड राहता यावे यासाठी सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे."

वी आरसी ९९ हे देशभरातील सर्व प्री-पेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे

Post a Comment

0 Comments