पुणे : माजी भारतीय नौसेनिक सतीश भोयर यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुराज भोयर यांना नुकतीच एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते देण्यात आली.
रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे असोसिएट डायरेक्टर प्रा. डॉ. वीरेंद्र भोजवानी आणि प्रा. डॉ. सुदर्शन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या क्रायोकूलरमध्ये वापरल्या जाणार्या स्पेशल पर्पज फ्लेक्सर स्प्रिंगच्या पॅरामेट्रिक इन्व्हेस्टिगेशन या प्रबंधासाठी केलेल्या उत्कृष्ठ योगदानासाठी त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
त्यांच्या शोध प्रबंधाला IMTEX’2020 दरम्यान राष्ट्रीय i2A प्रोजेक्ट पॅव्हेलियनमध्ये प्रथम पारितोषिक आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर पुरस्कार देखील मिळाला आहे.
त्यांच्या यशाबद्दल कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्णा, डॉ. किशोर रवंदे, डॉ. मोहित दुबे, डॉ. अतुल पाटील आणि इतर मान्यवरांच्या वतीने डॉ. सुराज भोयर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. सुराज यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांचे, विशेषत: त्यांची पत्नी आणि मुलगा, पर्यवेक्षक, मित्र परिवार आणि हितचिंतकांचे मनापासून आभार व्यक्त केले.
0 Comments