`सार्क` देशातील प्रतिनिधींची ग्राहक पेठेस भेट

कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी केले स्वागत; ५३ प्रतिनिधींचा सहभाग 


पुणे : भारत सरकारच्या वतीने सार्क देशांतील श्रीलंका, नेपाळ आणि बांग्लादेश या सार्क देशांतील सहकार क्षेत्रात काम करणार्‍या प्रतिनिधींचा दौरा पुण्यामध्ये वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित केला होता. या दौर्‍याचा एक भाग म्हणून विविध देशांतील ५३ प्रतिनिधींनी ग्राहक पेठेस भेट दिली. 


या दौर्‍याचे नेतृत्व वैकुंठ मेहता संस्थेच्या वतीने डॉ. डी.रवी यांनी केले. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी सर्वांचे स्वागत करून त्यांना ग्राहक पेठेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीची तसेच ग्राहक चळवळीची माहिती दिली. या प्रतिनिधी गटात ५३ सदस्यांचा समावेश होता. ग्राहक चळवळ, स्वदेशी अशा अनेक घटकांविषयी सदस्यांनी  जाणून घेतले. 

Post a Comment

0 Comments