कार खरेदीसाठी पुण्यामध्ये ‘स्पिनी पार्क’ चे नवीन भव्य दालन उद्घाटित


पुणे : ‘स्पिनी’, भारतातील वापरलेल्या कारच्या खरेदी विक्रीचे  सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व कामे करता येतील असे एक  संपूर्ण व्यासपीठ, यांनी आज पुण्यातील हिंजेवाडी गाव, मुक्काम पोस्ट वाकड येथे ‘स्पिनी पार्क’  हे एक अद्वितीय व अनोखे असे प्रयोगात्मक अनुभव केंद्र सुरू करण्याची घोषणा केली.


या पार्कची संकल्पना त्यांच्या स्वतः निवडलेल्या कार्सच्या संग्रहाद्वारे आणि त्यांच्या विस्तृत व अत्याधुनिक जागेच्या माध्यमातून शहरातील ग्राहकांचा कार खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध करते. या पार्कच्या उद्घघाटन प्रसंगी प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू उपस्थित होती.

हे नवीन स्पिनी पार्क एकूण तीन एकराच्या परिसरात पसरलेले आहे. येथे ५०० हून अधिक निवडक व स्पिनीकडून आश्वस्त अशा कार्स आणि स्पिनी मॅक्स पूर्व मालकीच्या लक्झरी कार्ससह मोठ्याप्रमाणात अनेक वेगवेगळ्या कार्स राहू शकतात आणि शिवाय कार्स पाहण्यासाठी, निवडण्यासाठी आणि त्यांची चाचणी घेण्यासाठीसुद्धा मोकळी जागा आहे.

पुण्यातील स्पिनी सोलापूर, औरंगाबाद आणि रत्नागिरीसह जवळपासच्या शहरांमध्ये घरपोच सेवा आणि घरोघरी तपासणीची सुविधा पुरवते. पुण्यातील कामकाज फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू झाल्यापासून स्पिनीने २५,००० हून अधिक कार्सच्या खरेदी विक्री व्यवहारांची सेवा दिली आहे, ज्याचा वाटा पुण्याच्या वापरलेल्या कार बाजारातील १०% पेक्षा जास्त आहे.

स्पिनीने मागील वर्षी बंगळूर येथे आपले प्रमुख आणि भारतातील सर्वात मोठे अनुभव केंद्र सुरू केले होते.

या घोषणेबाबत बोलताना स्पिनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंग म्हणाले की, पुणे ही आमच्यासाठी एक महत्त्वाची आणि भरभराटीची बाजारपेठ आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांचा शहरातील अनुभव उंचावण्यास उत्सुक आहोत. पुण्यातील स्पिनी पार्कमध्ये ५०० हून अधिक स्वतः निवडलेल्या कार्सचे विविध प्रकार आहेत. ग्राहकांना आराम मिळावा आणि त्यांच्या आवडत्या कारची चाचणी घेता यावी यासाठी हे आकाराने मोठे निसर्गरम्य परिसरात प्रायोगिक केंद्र उभे केले आहे.”


Post a Comment

0 Comments