पुणे : ऑर्बिसने पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल बरोबरच्या सहकार्यातून पुणे येथे एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील डिजिटल ट्रेनिंग हबचे उद्घाटन करण्यात आले.
उदघाट्नच्या वेळी कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे अध्यक्ष, प्रकाश आपटे, ऑर्बिस इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेरेक हॉडकी आणि पीबीएमएच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया उपस्थित होते.
नेत्र आरोग्य व्यावसायिकांची क्षमता उभारणी आणि प्रशिक्षणाचे पुढचे पाऊल असलेल्या डिजिटल ट्रेनिंग हब (डिटीएच) नेत्ररोग काळजी क्षमता वाढवण्यासाठी सिम्युलेशन प्रशिक्षण, टेली-मेंटॉरशिप, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि बरेच काही उपलब्ध करून देते
अत्याधुनिक वेट लॅब, कृत्रिम डोळे आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी सेटअपने सुसज्ज असलेले डिटीएच एका अनुभवी शिक्षकांच्या सहकार्याने कार्यरत आहे. या हबच्या नेत्र काळजी विभागात नेत्ररोग तज्ञ, भूल तज्ञ, नेत्ररोग अंतर्गत प्रशिक्षण, नेत्ररोग परिचारिका आणि नेत्ररोग तज्ञांची क्षमता वाढविण्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षणासह डिजिटायझेशन, सिम्युलेशन, टेली-मेंटॉरशिप, टेलि-एज्युकेशन आणि टेलिमेडिसिन उपलब्ध आहे.\
डिटीएचच्या माध्यमातून सँडविच फेलोशिप्स, ऑब्झर्व्हरशिप्स, हॉस्पिटल आधारित प्रशिक्षण, क्लिनिकल आणि सर्जिकल कौशल्ये, समस्या सोडवनिराकरण, आपत्ती व्यवस्थापन, इत्यादींचे प्रशिक्षण संमिश्र शिक्षण पद्धतीद्वारे उपलब्ध करते.
रिमोट सर्जिकल मेंटॉरशिप थेट नेत्ररोग शस्त्रक्रियेदरम्यान जागतिक तज्ञांकडून मार्गदर्शन मिळविण्याची एक अनोखी संधी देते. सिम्युलेशन प्रशिक्षणामुळे काचबिंदू, मोतीबिंदू, स्ट्रॅबिस्मस, डायबेटिक रेटिनोपॅथी इत्यादींवर कृत्रिम डोळे वापरून प्रशिक्षण देणे शक्य होते.
डिजिटल ट्रेनिंग हबच्या द्वारे संमिश्र प्रशिक्षण दृष्टिकोनाचा लाभ घेता येतो. जेणेकरून प्रशिक्षणार्थींचा जास्तीत जास्त सहभाग वाढेल आणि पीबीएमएच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलला नेत्ररोगाच्या इतर उपविशेषतांमध्येही याचा विस्तार करता येऊ शकेल अशी आशा आहे,” असे पीबीएमएच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया यांनी सांगितले.
डिजिटल ट्रेनिंग हबच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील तज्ञ सदस्यांच्या सहकार्यातून प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये व्हर्च्युअल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे विकास सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.
0 Comments