पुणे : स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ 'स्वरस्वती' या लतादीदींनी गायलेल्या व संगीतबद्ध केलेल्या अजरामर मराठी व हिंदी गीतांची मैफल रंगणार आहे.
गायिका मनिषा निश्चल्स महक निर्मित 'स्वरस्वती' ही मैफल येत्या सोमवारी (दि. ६ फ़ेब्रुवारी) कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुणेकरांना विनामूल्य ऐकता येणार आहे.
सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मराठी गीतांची, तर रात्री ९ ते १२ या वेळेत हिंदी गीतांचा नजराणा सादर होणार आहे.
गायिका स्वप्नजा लेले, अंजली मराठे, मनिषा निश्चल, तर गायक जितेंद्र अभ्यंकर आणि गफ़ार मोमिन यांचे बहारदार गायन होणार असून, प्रसन्न बाम यांच्या संगीत संयोजनात यश भंडारे, केदार मोरे, अमित कुंटे, अभय इंगळे, अजय अत्रे, अनिल करमरकर, शैलेश देशपांडे, राधिका अंतुरकर या वाद्यवृंदाची साथसंगत असणार आहे.
0 Comments