महावितरणमधील राज्यस्तरीय विजेते खेळाडू, कलावंत व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गौरव
पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा गुरुवारी (दि. १६) येथील अल्पबचत भवनात उत्साहात साजरा झाला. वीजग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कौटुंबिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे नवी ऊर्जा मिळाली.
महावितरणच्या वर्धापनदिनासह कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा व मनोरंजनपर असे वर्षभरात दोन कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा पुणे परिमंडलाने राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद तसेच नाट्यस्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा करंडक पटकावला आहे. यातील विजेत्यांचा गुणगौरव करण्याचे औचित्य साधून पुणे परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या स्नेहमेळाव्यात प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, महाव्यवस्थापक (वित्त) श्री. अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंता सर्वश्री प्रकाश राऊत, सतीश राजदीप, शंकर तायडे, डॉ. सुरेश वानखेडे, सौ. पुनम रोकडे, उपमहाव्यवस्थापक (मासं) श्री. अभय चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर (पुणे), श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) यांच्यासह परिमंडलातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी कुटुंबियांसह सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात राज्यस्तरीय क्रीडा व नाट्यस्पर्धेतील विजेत्या खेळाडू व नाट्यकलांवतांचा तसेच शैक्षणिक प्राविण्य मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. यानंतर हिंदी व मराठी गाण्यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी, श्री. संतोष गहेरवार यांनी केले तर वरिष्ठ व्यवस्थापक सौ. अपर्णा माणकीकर यांनी आभार मानले.
0 Comments