पुणे : नावी म्युच्यूअल फंडाने करबचत करणारा पँसिव्ह ईएलएसएस फंड प्रकारात नावी ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड बाजारात गुंतवणूकीसाठी आणला आहे.
सदर नवीन फंड ऑफर (एनएफओ) १४ फेब्रुवारी २०२३ पासून खुला झाला असून २८ फेब्रुवारी २०२३ ला बंद होणार आहे. थेट योजनेत खर्च गुणोत्तर ०.१२ टक्के इतके प्रमाण असणारा हा फंड भारतात ईएलएसएस फंड प्रकारात सर्वाधिक कमी खर्चिक करबचत फंड आहे.
प्राप्तीकराच्या कलम ८० सी अंतर्गत या फंडाला फक्त तीन वर्ष इतका कमी मुदतबंद कालावधी लागू आहे. मुदतबंद कालावधीनंतर या फंडातून बाहेर पडताना कोणतेही मुदत निर्बंध शुल्क आकारले जात नाहीत. या फंडात गुंतवणूकदार अगदी कमीत कमी पाचशे रुपये इतक्या छोट्या गुंतवणूकीपासून सुरुवात करु शकतात.
सध्या करबचतीच्या ईएलएसएस योजना राबवत असलेल्या फंडांसाठी सेबीने नुकत्याच जारी केलेल्या नवीन नियमावलींमुळे कार्यरत योजनांमध्ये गुंतवणूकीचा ओघ नियंत्रित झाला आहे. त्यामुळे पॅसिव्ह प्रकारात ईएलएसएस योजना सुरु करणे फंडाना शक्य झाले आहे.
नावी ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड योजनेच्या शुभारंभामुळे या नियमावलींचा लाभ घेणारा नावी हा भारतातील पहिला म्युच्यूअल फंड ठरला आहे.
नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना नावी समुहाचे सहसंस्थापक सचिन बन्सल म्हणाले की, म्युच्यूअल फंड ग्राहकांच्या प्रमुख समस्यांवर तोडगा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रीत करणारा नावी ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंडाच्या माध्यमातून नावीने खास फंड बाजारात आणला आहे.
योग्य मूल्यात कर-बचत करणाऱ्या गुंतवणूक प्रकारात अप्रत्यक्ष (पॅसिव्ह) प्रकारे गुंतवणूक करणारा हा फंड ग्राहकाभिमुख योजनेचे आणखी एक उदाहरण आहे.
कंपनीच्या या एनएफओत गुंतवणूकदार १४ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान गुंतवणूक करु शकतात आणि त्यासाठी नावी अॅप अथवा म्युच्यूअल फंडाच्या विविध गुंतवणूक साधनांचा वापर करु शकतात.
0 Comments