डॉ निलेश बलकवडे यांना राष्ट्रीय यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित


पुणे : ओअॅसिस फर्टिलिटीचे प्रमुख आणि फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. निलेश उन्मेष बलकवडे यांच्याशिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भोपाळ येथे झालेल्या आयएसएआर परिषदेत त्यांना  मध्य प्रदेशचे माननीय आरोग्यमंत्री श्री. प्रभूराम चौधरी यांच्या हस्ते यूथ आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


त्यावेळी आयएसएआरच्या अध्यक्ष डॉ. नंदिता पी. पळशेटकर यावेळी उपस्थित होत्या. कमी वयात त्यांनी वंध्यत्वाच्या क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिल्यामुळे आणि युवकांसाठी प्रेरणास्थान ठरल्याबद्दल डॉ. निलेश उन्मेष बलकवडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


डॉ. निलेश उन्मेष बलकवडे यांनी आपली तज्ज्ञता, ध्यास, समर्पण आणि असामान्य कटिबद्धतेच्या जोरावर एवढ्या कमी वयात मोठे शिखर गाठले आहे. आय विश टू बी ए मिलेनियल मॉम, वंध्यत्व सल्ला शिबिर, चर्चा कार्यक्रम, मोहीम अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेक जोडप्यांचे पालक होण्याचेे स्वप्न साकार करण्यात मदत केली आहे.


तसेच त्यांनी कार्यशाळा, सीएमई, मला आई व्हायचंय अभियान, इत्यादींच्या माध्यमातून वंध्यत्व क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रशिक्षण दिले आहे. डॉ. निलेश हे महाराष्ट्रातील प्रमुख वंध्यत्व तज्ज्ञांपैकी एक असून पेशंट फर्स्ट या धोरणाद्वारे त्यांनी वंध्यत्वाने ग्रस्त असलेल्या हजारो जोडप्यांना पालक होण्यास मदत केली आहे.


हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. निलेश बलकवडे म्हणाले, हा पुरस्कार मिळणे हा माझा गौरव आहे. परवडणाऱ्या, पुराव्यांवर आधारित आणि यशाची जास्त हमी देणाऱ्या वैयक्तिकरीत्या वंध्यत्वाचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”


ओअॅसिस फर्टिलिटीचे (वाकड आणि खराडी) येथे आययूआय, आयव्हीएफ, आयव्हीएम, फर्टिलिटी प्रीजर्व्हेशन, डोनर ट्रीटमेंट्स इत्यादींसहित विविध प्रकारचे वंध्यत्व उपचार उपलब्ध आहेत. अँड्रोलाईफ या खास अशा पुरुष वंध्यत्व क्लिनिकच्या माध्यमातून टेसा, मायक्रोटीईएसई,


मायक्रोफ्लूईडिक्स, एमएसीएस इ. सारखे प्रगत पुरुष वंध्यत्व उपचार पुरुषांना उपलब्ध करून देण्यात येतात जेणेकरून त्यांचे पिता बनण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे. आयव्हीएफ लॅब, प्रगत तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट वंध्यत्व तज्ज्ञ व भ्रूणतज्ज्ञ यांमुळे ओअॅसिस फर्टिलिटीमध्ये सातत्याने यशाचे प्रमाण जास्त राहिले आहे.


Post a Comment

0 Comments