`मोका`च्या गुन्ह्यातील सराईत आरोपीची कर्वेनगरमध्ये निर्घृण हत्या

कर्वेनगर परिसरातील घटनेने खळबळ, अलंकार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

पुणे : शहरातील कर्वेनगर भागातील पीएनजी ज्वेलर्स जवळील गल्लीमध्ये  हॅपी काॅलनी या ठिकाणी नंदू जाधव ( वय 22 वर्षे) हा `मोक्का`चा आरोपी मित्रा बरोबर गप्पा मारत असताना अज्ञात व्यक्तीकडून रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यानतीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह  दिग्गज नेते सध्या पुण्यात तळ ठोकून आहेत. मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या बंदोबस्तासाठी पुणे पोलिस व्यस्त असल्याचा फायदा गुन्हेगारांनी घेतल्याचे पहायला मिळत आहे. 


अलंकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेला नंदू जाधव हा `मोक्का` अंतर्गत आरोपित होता. माळवाडी पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. यातून नुकताच को जामिनावर बाहेर आला होता. अज्ञातांकडून त्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिस आरोपींचा जागोजागी शोध घेत आहेत. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुजेटदेखील तपासत आहेत. 

पुढील तपास अलंकार पोलिस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या संगीता पाटील करीत आहे  


Post a Comment

0 Comments