विनीत कुबेर, सुरेंद्र कर्डिले यांचा 'यशोधन सन्मान' देऊन गौरव

चौफेर प्रतिष्ठान व श्री यशोधन नागरी पतसंस्थेतर्फे आयोजन

चौफेर प्रतिष्ठान व श्री यशोधन नागरी पतसंस्थेतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. तसेच सामाजिक कार्यकर्ते विनीत कुबेर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

पुणे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले विनीत कुबेर आणि सहकार क्षेत्रातील सुरेंद्र कर्डिले यांचा यशोधन सन्मान देऊन गौरव करण्यात आला. चौफेर प्रतिष्ठान व श्री यशोधन नागरी पतसंस्थेतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील झाले.

 

यावेळी पुणे मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेविका गायत्री खडके, संस्थेचे अध्यक्ष अविनाश आपटे, उपाध्यक्ष आशा क्षीरसागर, माऊली पासलकर, राहुल भाटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. वीरेंद्र कुंटे आणि मंदार तेरेदेसाई यांनी केलेल्या मंत्रपठणाने २८ व्या स्नेहमेळावा कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कोकणातील माऊली वृद्धाश्रमास दोन्ही संस्थांतर्फे २५ हजार रुपयांची आर्थिक मदतही करण्यात आली.

 

हेमंत रासने म्हणाले, सामाजिक व आर्थिक संस्थेत काम करणे अत्यंत जिकरीचे असते. येथे काम करताना वेगळे बंधने व जबाबदारी देखील असते. समाजाचे भान ठेऊन हे काम करावे लागते. चांगले कार्य व राष्ट्रहिताचे कार्य करण्यासाठी लोकसहभाग गरजेचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

राहुल भाटे म्हणाले, सन १९९५ सालापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाचे यंदा २८ वे वर्ष आहे. गौरी थिएटर व पुणे टॉकिज प्रस्तुत तू म्हणशील तसं... हे नाटक देखील पुणेकरांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आले होते. कलाकार संकर्षण क-हाडे, भक्ती देसाई यांनी सादरीकरण केले. गौरी दामले यांनी नाटकाची निर्मीती केली असून प्रसाद ओक यांनी दिग्दर्शन केले.

 

संस्थेचे ज्ञानेश्वर पासलकर, अविनाश आपटे, राहुल भाटे, आशा क्षीरसागर, निरंजन गोळे, अभिजीत गाडगीळ, केतन जोगळेकर, प्रथमेश भिलारे, स्वानंद गोळे, शैलेश खरे, प्रिती पारकर आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.


Post a Comment

0 Comments