पुणे : 'रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन' च्या 'व्होकेशनल एक्सलन्स अवार्डस्, सर्व्हिस एक्सलन्स अवार्डस् २०२३' चे वितरण ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते, रोटरीचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार कार्यक्रमात करण्यात आले.
ज्येष्ठ सनदी लेखापाल भूषण तोष्णीवाल आणि डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना व्होकेशनल एक्सलन्स अॅवार्डस् देण्यात आले. दृष्टीहीन कल्याण संघ या संस्थेला सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
ममता सिंधुताई सपकाळ, सीआयडी क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक विलास जाधव ,रोटरीच्या सहप्रांतपाल टीना रात्रा, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन च्या अध्यक्ष पद्मजा जोशी, सचिव अश्वीनी शिलेदार आणि निमंत्रक पल्लवी दोसी हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी देवधर यांनी केले. १५ जानेवारी २०२३ रोजी गांधी भवन, कोथरूड येथे संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम पार पडला.
पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या उत्स्फूर्त भाषणाने सर्वांचीच मने जिंकली .त्यांच्या भाषणात त्यांनी भारताचा विकास आणि तंत्रज्ञान याविषयी महत्वपूर्ण विचार मांडले .तर मोहन पालेशा यांच्या शेरोशायरीने कार्यक्रमास रंगत आली.
सीए भूषण तोष्णीवाल यांचे भाषण खूपच स्फूर्तीदायक होते. ते म्हणाले,' लहानपणापासूनच आई-वडिलांची सक्षम साथ मिळाली त्यामुळे ध्येय गाठू शकलो. डॉ. हिरेमठ म्हणाले, 'आपले भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या पंचसूत्री वर मी विश्वास ठेवला, त्यामुळे सफलता मिळाली.
मी स्वतःला कधीही दिव्यांग समजत नाही, हेच माझ्या यशाचे रहस्य आहे'. दृष्टिहीन कल्याण संघाच्या रेणूताई कोडोलीकर यांच्या भावुक भाषणाने सगळ्यांचे डोळे पाणावले.
0 Comments