नागालॅंडमधील १८०० भारतीय सैनिकांना तीळगुळाची भेट

भारत-पाकिस्तान सीमेवरील  चकबामा येथे तैनात ४४ माउंटन ब्रिगेडला पाठवला तीळगूळ

नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टचा पुढाकार


पुणे : कधी कडकडीत ऊन, कधी मुसळधार पाऊस, कधी वादळवारा, तर कधी रक्त गोठवणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत शत्रूशी झुंज देणारे आपले भारतीय सैनिक. सीमेवर २४ तास कठीण परिस्थितीला सामोरे जात असतात. अशा या भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांची संक्रात गोड करण्यासाठी नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट आणि स्वारद फाउंडेशनच्या वतीने तिळगूळ पाठविण्यात आला.


सीमेवरील  १८०० सैनिक आणि २०० स्थानिक नागरिक अशा २ हजार जणांना पुण्यातून तिळाची वडी, तिळाचे लाडू व तिळगुळ पाठविण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त अनेक देशभक्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.


उपक्रमासाठी स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचे सहकार्य मिळाले व ब्ल्यू डार्ट कुरियरचे  कंपनीचे चेतन चौधरी यांच्या विशेष प्रयत्नातून तिळगुळ अपेक्षित ठिकाणी वेळेत पोहचविण्यात आला. लेफ्टनंट राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण उपक्रम यशस्वी झाला.


मंडळातर्फे पुणेकरांना तिळगूळ जमा करण्याकरीता आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार २०० किलो तिळाच्या वडया, लाडू व हलवा एकत्र करण्यात आला. त्यानंतर तो प्रत्यक्ष सिमारेषेवर सैनिकांना पाठविण्यात आला. 

Post a Comment

0 Comments