ऑटो एक्सपोमध्ये स्विच मोबिलिटीतर्फे नव्याकोऱ्या leV मालिकेचे सादरीकरण


·  लास्ट माईल आणि मिड माइल मोबिलिटी अॅप्लिकेशन्स सुविधेसाठी स्विचचा विलक्षण अशा

   इलेक्ट्रिक वाहन विभागांत प्रवेश


·  स्विच ग्रेटर नोएडा येथील एक्स्पो ग्राउंड्स मध्ये हॉल क्रमांक १२ स्टॉल क्रमांक एन १५ मध्ये अशोक 

    लेलँडसह एकात्मिक स्टँडचा भाग असेल.


नोएडा : अत्याधुनिक कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलकी व्यावसायिक वाहने बनविणारी कंपनी स्विच मोबिलिटी लिमिटेड ('SWITCH'), हिंदुजा समूह कंपनीने आज ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये नव्याकोऱ्या leV मालिकेचे सादरीकरण केले आहे. या विलक्षण, इलेक्ट्रिक वाहनांद्वारे स्विच भारतात लास्ट माईल आणि मिड माइल मोबिलिटी अॅप्लिकेशन्सच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल.


स्विच मोबिलिटीचे कार्यकारी अध्यक्ष धीरज हिंदुजा म्हणाले की, "स्विचच्या स्थापनेनंतर कंपनीची लक्षणीय वाढ झाली असून अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठेत इतक्या कमी कालावधीत आम्हाला मिळालेल्या प्रगती आणि सकारात्मक प्रतिसादामुळे मला आनंद झाला आहे. स्विचची वाढ सुरूच असताना कंपनीच्या जागतिक धोरणाशी सुसंगत नवनवीन क्षेत्रात विस्तार करत असताना नाविन्यपूर्ण आणि कुशल सादरीकरणासह इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन [CV] बाजारपेठेलाही आम्ही चालना देत राहू.


ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये प्रदर्शित केलेल्या आमच्या उत्पादनांद्वारे, विविध भौगोलिक क्षेत्रांतील समुदायांना त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि येत्या काही वर्षांत अधिक मजबूत गतीची अपेक्षा करणार्‍या उद्योगाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे."


स्विच मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, "लास्ट माईल आणि मिड माईल वाहतुक क्षेत्रात शाश्वत मोबिलिटी सोल्यूशन्सची मागणी वाढत आहे. जागतिक स्तरावर उत्पादनाचा अतुलनीय पर्याय सादर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन इलेक्ट्रिक वाहन उद्योगात एक ब्रँड प्रस्थापित करण्यात स्विच यशस्वी झाले आहे.


आजचा दिवस आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण भारतातील लास्ट माईल आणि मिड माईल वाहतुक क्षेत्राच्या गरजा परिवर्तीत करण्यासाठी  आम्ही ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये आमच्या नव्याकोऱ्या स्विच leV मालिकेच्या सादरीकरणासह एका नवीन अध्यायाकडे वाटचाल करत आहोत. उत्कृष्ट ग्राहक मूल्य प्रस्ताव वितरीत करत या  leV मालिकेचे लक्ष्य  १.२ टी – ४.५ टी पासून सुरू होणार्‍या विस्तृत पेलोडकडे आहे. आमच्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही शाश्वत उत्पादने, सेवा आणि सुविधा यांच्या मजबूत पोर्टफोलिओवर काम करणे सुरू ठेवू. "


अत्याधुनिक, विलक्षण इलेक्ट्रिक कनेक्टेड वाहन हे सिद्ध आणि मजबूत मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले असून रिमोट, रिअल-टाइम डायग्नोस्टिक्स आणि मॉनिटरिंग सक्षम करण्यासाठी 'स्विच आयन' या प्रॉपरायटरी टेक्नॉलॉजी सुविधेसह आहे आणि अतुलनीय कामगिरी आणि कार्यक्षमता पुरविते.


स्विच  leV मालिका GVW रेशनसाठी सर्वोत्तम पेलोड, १५० किमी पर्यंतची सर्वात लांब रेंज कव्हरेज, जलद टर्नअराउंड वेळ, श्रेणीतील सर्वोत्तम मालवाहू जागा आणि उत्कृष्ट विश्वासार्हतेसह कामकाजाची एकूण अनुकूल किंमत देते.


या बाजारपेठेतील आघाडीच्या उत्पादन मालिका आणि तंत्रज्ञानाद्वारे वाहतूक सुलभ, स्वच्छ, आरामदायी आणि अधिक कार्यक्षम करत स्वच्छ आणि हरित दळणवळणाला पाठबळ देण्यासाठी स्विच महत्त्वाची भूमिका बजावत राहील.

Post a Comment

0 Comments