पुण्‍याच्‍या निवासी विक्री आकारमानात वार्षिक १७ टक्‍क्‍यांची वाढ

२०२२ मध्‍ये एकूण ४३,४१० सदनिकांची विक्री; नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालातील माहिती

File Photo

पुणे : नाइट फ्रँक इंडियाने नुकताच त्‍यांचा प्रमुख सहामाही अहवाल ‘इंडिया रिअल इस्‍टेट २०२२’ची १८वी आवृत्ती लॉन्‍च केली. हा अहवाल जुलै-डिसेंबर २०२२ (२०२२ ची दुसरी सहामाही) कालावधीसाठी आठ प्रमुख शहरांमधील निवासी व कार्यालयीन बाजारपेठ कामगिरीच्‍या सर्वसमावेशक विश्‍लेषणाला सादर करतो आहे.


या नवीन अहवालामधून असे नमूद करण्‍यात आले आहे की, पुण्‍याच्‍या निवासी बाजारपेठेने कॅलेंडर वर्ष (सीवाय) २०२२ मध्‍ये विक्री आकारमानात वार्षिक १७ टक्‍क्‍यांची वाढ केली, जेथे वर्षामध्‍ये ४३,४१० सदनिकांच्‍या विक्रीची नोंद करण्‍यात आली. तसेच पुण्‍याच्‍या वार्षिक कार्यालयीन भाडेदरामध्‍ये वार्षिक ६१ टक्‍क्‍यांची वाढ करून ६.२ दशलक्ष चौरस फूट (दशलक्ष चौ. फूट) जागा भाडेतत्त्वावर देण्‍याची प्रक्रिया नोंदीत झाली आहे.


पुण्‍याच्‍या निवासी बाजारपेठेची वैशिष्‍ट्ये

२०२२ मध्‍ये पुण्‍याने २०१३ पासून सर्वोत्तम निवासी विक्रीची नोंद केली. सलग तारण दर वाढ आणि अतिरिक्त १ टक्‍के मेट्रो उपकर यामुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम होऊन देखील गृह खरेदीदारांचा दृष्टीकोन आशावादी आहे. पण, पुण्यातील वार्षिक सादरीकरणे ५ टक्‍क्‍यांची घट होऊन ३८,६४० सदनिकांवर आले.


पुण्‍याच्‍या निवासी बाजारपेठेचा सारांश

निकष

२०२२

२०२२ मधील बदल (वार्षिक) 

२०२२ ची दुसरी सहामाही 

२०२२ च्‍या दुसऱ्या सहामाहीमधील बदल (वार्षिक) 

सादरीकरणे (सदनिकांची संख्‍या)

३८,६४०

-५ टक्‍के

२१,२४७

६ टक्‍के

विक्री (सदनिकांची संख्‍या)

४३,४१०

१७ टक्‍के

२१,६१३

९ टक्‍के

सरासरी किंमत रूपये/चौ.मी(रूपये/चौ.फूट) मध्‍ये

४६,२०४ रूपये (,२९३ रूपये)

७ टक्‍के

 

-

नोंद: १ चौरस मीटर (चौ. मी.) = १०.७६४ चौरस फूट (चौ. फूट)

स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च

अनेक अडथळ्यांनंतर देखील पुण्‍याच्‍या निवासी बाजारपेठेची स्थिरता २०२२च्‍या दुसऱ्या सहामाहीमधील वार्षिक ९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २१,६१३ सदनिकांच्‍या सहामाही विक्रीमधून स्‍पष्‍टपणे दिसून येते. अधिकाधिक गृहखरेदीदार नुकतेच स्‍थायिक होण्‍यासोबत विशेषत: पगारदार कामगार गृह तारणाचा अवलंब करत असताना रेपो दरामध्‍ये वाढ होऊन देखील त्‍यांची भूमिका सकारात्‍मक आहे. दरम्‍यान २०२२ च्‍या दुसऱ्या सहामाहीमध्‍ये बाजारपेठेतील नवीन सादरीकरणांमध्‍ये वार्षिक ६ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली, ज्‍यामधून २१,२४७ सदनिकांच्‍या पुरवठ्याची नोंद झाली. 


२०२२ च्‍या दुसऱ्या सहामाहीमध्‍ये विक्री आकारमान प्रामुख्याने शहराच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिम झोनमध्ये केंद्रित होते, ज्यांचा वाटा अनुक्रमे ३२ टक्‍के, २८ टक्‍के आणि २३ टक्‍के होता. मध्य, पश्चिम आणि उत्तर विभागातील नवीन सादरीकरणे एकूण सादरीकरणांपैकी अनुक्रमे २० टक्‍के, २६ टक्‍के आणि १० टक्‍के होते.


२०२१ ची दुसरी सहामाही आणि २०२२ ची दुसरी सहामाहीधील विक्रीचे सूक्ष्‍म-बाजारपेठ विभाजन

cid:image008.png@01D92520.6D574F80cid:image006.png@01D92520.6D574F80

स्रोतनाइट फ्रँक रिसर्च


पुण्‍यातील ५ दशलक्ष ते १० दशलक्ष रूपये तिकिट आकाराच्‍या निवासी विक्रीने २०२१ च्‍या पहिल्‍या सहामाहीमधील ४० टक्‍कयांच्‍या तुलनेत २०२२ च्‍या दुसऱ्या सहामाहीमध्‍ये ४५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली, तर ५ दशलक्ष रूपयांपेक्षा कमी तिकिट आकाराच्‍या निवासी विक्रीने २०२१ च्‍या दुसऱ्या सहामाहीमधील ५२ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत २०२२ च्‍या दुसऱ्या सहामाहीमध्‍ये ४६ टक्‍क्‍यांसह वाटामध्‍ये घटची नोंद केली.

वाटा योगदानामधील या बदलासाठी उत्‍पादनांच्‍या किंमतीत एकूण झालेली वाढ कारणीभूत असू शकते. १० दशलक्ष रूपयांपेक्षा अधिक किंमतीच्‍या मालमत्तांनी देखील वाटामध्‍ये २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीमधील ८ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत २०२२ च्‍या दुसऱ्या सहामाहीमध्‍ये ९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद केली.

Post a Comment

0 Comments