22 पासून ‘ऊर्जा’ युवा संगीत महोत्सवात संगीत-नृत्याची बहार

आवर्तन गुरुकुल, नील दीक्षित व कन्नडा संघाचे आयोजन


पुणे : युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातील आवर्तन गुरुकुल, नील दीक्षित व कन्नडा संघ पुणेचे कावेरी कलाक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. २२ जानेवारी, २०२३ रोजी ‘ऊर्जा’ या विशेष युवा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


एरंडवणे, गणेशनगर येथील कर्नाटक हायस्कूलमधील शकुंतला शेट्टी सभागृहात सकाळी १०.३० ते १.३० आणि सायंकाळी ५.३० ते ५.३० अशा दोन सत्रांत सदर महोत्सव होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल.



ऊर्जा या युवा संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्रात कथक गुरु शमा भाटे यांच्या शिष्या श्रद्धा मुखडे व श्रेया कुलकर्णी यांचे कथक नृत्य सादर होईल. यानंतर पं रामदास पळसुले यांचे शिष्य असलेल्या हेमंत जोशी यांचे एकल तबलावादन होईल.


सायंकाळच्या सत्राची सुरुवात पद्मविभूषण पं शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने होईल. तर गुरु पं राम देशपांडे यांचे शिष्य असलेल्या गंधार देशपांडे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे हे करणार असून सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना अमेय देशपांडे, अजिंक्य जोशी, श्रीराज ताम्हणकर, अमीरा पाटणकर, यशवंत थित्ते, अमेय बिचू, शुभम खंडाळकर हे साथसंगत करतील.

Post a Comment

0 Comments