महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजन
पुणे : एमजेएम ग्लॅडिएटर, श्री माव्हरिक्स या संघांनी महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी सिक्स-अ-साइड फुटबॉल लीगमध्ये चमकदार कामगिरी करून आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावला.
गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमधील फुटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्धाटन महाराष्ट्र विद्या प्रचारक मंडलच्या सचिव सुशीला राठी यांच्या हस्ते झाले. यावेळी महेश सेवा संघ युवा समिती अध्यक्ष विशाल राठी, सचिव केतन जाजू,प्रोजेक्ट चेअरमन आकाश झंवर,प्रोजेक्ट सेक्रेटरी ऋषी भुतडा, वेदांत करवा, महेश सेवा संघ सचिव ओमप्रकाश गट्टानी, उद्योजक गिरिधर काळे, डाॅ. प्राजक्ता काळे उपस्थित होते.
अ गटात ग्लॅडिएटर संघाने पाच पैकी चार लढती जिंकल्या, तर एक लढत गमावली. ग्लॅडिएटर संघ १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. पीपी रॉयल्स संघ दोन लढती जिंकल्या, तर तीन लढती बरोबरीत सोडविल्या. नऊ गुणांसह हा संघ दुस-या क्रमांकावर आहे. रेडिएन्ट रोबेल्स हा संघ ८ गुणांसह तिस-या क्रमांकावर राहिला.
ब गटात श्री माव्हरिक्स संघाने पाच लढतींपैकी तीन लढती जिंकल्या, तर दोन लढती बरोबरीत सोडविल्या. ११ गुणांसह माव्हरिक्स संघ अव्वल क्रमांकावर आहे. तपाडियाज थंडर संघाने पाच पैकी दोन लढती जिंकल्या, तर दोन लढती बरोबरीत सोडविल्या,
एक लढतीत या संघाला पराभव पत्करावा लागला. थंडर संघ आठ गुणांसह दुस-या क्रमांकावर आहे. साई मिरॅकल डिस्ट्रॉयर्स संघ सहा गुणांसह तिस-या क्रमांकावर आहे
निकाल याप्र्माणे – एनपीएव्ही निंजाज – १ (निराज सोमानी) वि. वि. साई मिरॅकल डिस्ट्रॉयर्स – ०; व्हाइटफिल्ड वारलॉर्ड्स – ६ (रोहित राठी ४, अभिनंदन बी. १) वि. वि. व्हरटेक्स अससिन्स – १ (यश दरक);
श्री माव्हरिक्स – २ (मानस दरक १, अक्षत १) वि. वि. तपाडियाज थंडर - ०; पीपी रॉयल्स – ० बरोबरी वि. सीएनजी राठी रॉयल्स - ०; एमजीएम ग्लॅडिएटर्स – ३ (नवल मालपाणी १, निहार झंवर १, श्लोक झंवर १) वि. वि. रेडिएंट रेबेल्स – १ (नीरज डार्गा १); श्री माव्हरिक्स – २ (पवन १, अंकित मुंदडा १) वि. वि. एनपीएव्ही निंजाज - ०; एमजीएम ग्लॅडिएटर्स – १ (यश तोष्णीवाल १)
बरोबरी वि. व्हरटेक्स अससिन्स – १ (निहार झंवर १) ; रेडिएंट रेबेल्स – २ (नीरज डार्गा १, हृषीकेश १) वि. वि. व्हाइटफिल्ड – १ (अभिनंदन बी. १) ; पी. पी. रॉयल्स – १ (धीर मंत्री १) वि. वि. एमजीएम ग्लॅडिएटर्स – ०; श्री माव्हरिक्स – ४ (सर्वेश २, अक्षत २) वि. वि. फँटम -०; पी. पी. रॉयल्स – २ (सागर कारवा १, भाग्येश १) बरोबरी वि. व्हाइटफिल्ड – २ (अभिनंदन बी. १, जय कारवा १) ; तपाडिया थंडर्ज – ३ (वरुण पोरवाल २, वेदांत मालू १) वि. वि. फँटम – ०.
0 Comments