Fastrackचे किफायतशीर स्मार्ट सेगमेंटमध्ये पदार्पण

ऍमेझॉन इंडियावर दाखल केले REFLEX BEAT+



बंगलोर : भारतातील सर्वात मोठा, तरुणाईचा लाडका, ऍक्सेसरीज ब्रँड Fastrack ने नवे REFLEX BEAT+ लॉन्च करून किफायतशीर स्मार्ट वेयरेबल विभागात पदार्पण केले आहे. Fastrackच्या नव्या REFLEX BEAT+ घड्याळामध्ये 1.69'' UltraVU Display असून 60Hz रिफ्रेश रेट, 500 nitsची ब्राईटनेस क्षमता असल्याने युजर्सना इमर्सिव्ह अनुभव घेता येतो.


1.69'' UltraVU Display आणि 60 Sports Modes असलेले नवे स्मार्ट वॉच अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असून फक्त ऍमेझॉन फॅशनवर खरेदी करता येईल.


Fastrackने REFLEX BEAT+ ची किंमत अतिशय किफायतशीर ठेवली असून ऍमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये याची स्पेशल लॉन्च किंमत १४९५ रुपये ठेवली आहे.  REFLEX BEAT+ मध्ये सर्व हेल्थ सूट सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, हार्ट रेट मॉनिटर, विमेन हेल्थ मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, एसपीओ२ मॉनिटर या आरोग्याला पूरक सुविधांमुळे REFLEX BEAT+ एक दर्जेदार वेयरेबल डिव्हाईस बनले आहे.


या स्मार्ट वॉचचा टचस्क्रीन डिस्प्ले युजर्सना असीमित अनुभव प्रदान करतो. सिलिकॉन स्ट्रॅपमुळे हे स्मार्ट वॉच मनगटावर अगदी फिट बसते. यामध्ये 60 Sports Modes आणि IP68 रेटिंग आहे. या स्मार्ट वॉचला धूळ आणि पाण्याचा काहीही त्रास होत नाही त्यामुळे सर्व प्रकारच्या खेळांमध्ये आणि साहसांमध्ये हे वेयरेबल तुम्हाला उत्तम साथ देऊ शकते.


FASTRACK REFLEX BEAT+ अनेक उपयुक्त व अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी तसेच फॅशनेबल घटकांनी परिपूर्ण आहे. यामध्ये १०० पेक्षा जास्त क्लाऊड वॉचफेसेस आहेत. आपल्या व्यक्तिगत स्टाईलनुसार वॉचफेसेस कस्टमाइज करण्याची मुभा देखील युजर्सना यामध्ये मिळते. बीज लाते, वाईन रेड, ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन आणि डीप टील हे रंगांचे पाच आकर्षक पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत.


टायटन कंपनी लिमिटेड वेयरेबल्स डिजिटल हेल्थ इनोव्हेटर विभागाचे सीओओ श्री. रवी कुप्पुराज यांनी सांगितले,"किफायतशीर वेयरेबल विभागातील आमचे पहिले उत्पादन REFLEX BEAT+ ऍमेझॉन फॅशनसोबत विशेष भागीदारीमध्ये सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आज संपूर्ण देशभरातील ग्राहकांसाठी स्मार्ट वॉचेस अतिशय उपयुक्त ठरत आहेत.


शिवाय फॅशनेबल देखील असल्याने स्मार्ट वॉच ही एक गरज बनली आहे. नवनवीन उत्पादने सादर करून फॅशन व फिटनेसबाबत जागरूक असणाऱ्या युजर्सपर्यंत पोहोचावे व त्यांना भरपूर वेगवेगळ्या पर्यायांची उत्तम श्रेणी उपलब्ध करवून द्यावी हा आमचा प्रयत्न आहे. या नव्या उत्पादनासाठी ऍमेझॉन फॅशनसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. REFLEX BEAT+ हा देशातील प्रत्येकाच्या स्टाईलचा एक भाग बनलेला पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."


ऍमेझॉन फॅशन इंडियाचे डायरेक्टर व हेड श्री. सौरभ श्रीवास्तव यांनी सांगितले, "ऍमेझॉन फॅशनवर आमच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये Fastrackचे नवे स्मार्टवॉच REFLEX BEAT+ लॉन्च करताना आणि Fastrackसोबतचे आमचे दीर्घ काळापासूनचे घनिष्ठ संबंध अधिक घट्ट करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.


फॅशनेबल स्मार्ट वॉचेसची मागणी सातत्याने वाढत आहे आणि २०२३ मध्ये ती अजून जास्त वाढेल. FASTRACK REFLEX BEAT+ तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवते, कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल यासारखी वैशिष्ट्ये असल्याने मनोरंजनाचीही पुरेपूर काळजी घेते. भारतात ग्राहक फॅशनची खरेदी ज्याप्रकारे करतात त्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे आणि फॅशन, तंत्रज्ञान व फिटनेसबाबत आमच्या ग्राहकांसाठी सहज उपलब्ध होऊ शकतील अशा किफायतशीर किमतींच्या उत्पादनांसह आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे."


FASTRACK REFLEX BEAT+ फक्त १४९५ रुपये या लॉन्च किमतीला उपलब्ध आहे.  याची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ५ दिवस चालते. हे डिव्हाईस सर्वोत्तम आणि किफायतशीर असून कॅमेरा कंट्रोल व म्युझिक कंट्रोल यासारख्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असल्याने तुमच्या मनोरंजनविषयक सर्व गरजा पूर्ण करते. प्रवासात असताना देखील नोटिफिकेशन अलर्ट्स मिळतात, कॉल्स रिजेक्ट करता येतात. अगदी हवामानाचे अलर्ट्स देखील तुम्हाला तुमच्या मनगटावर मिळतात. एखाद्या प्रवासाला निघाल्यावर यामध्ये हवामानाविषयीचे तपशील बदलत राहण्याची आवश्यकता नाही.

Post a Comment

0 Comments