क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
पुणे : मालमत्ता खरेदी-विक्री मध्यस्थ अर्थात रिअल इस्टेट एजंटला आता नोंदणी करताना प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार असल्याची अट महारेराने घातली आहे, हे एक आश्वासक व स्वागतार्ह्य पाऊल असून यामुळे घरखरेदीदारांचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी कळविली आहे.
याविषयी बोलताना ते म्हणाले, “तांत्रिक बाबींची योग्य माहिती नसल्याने अनेकदा रिअल इस्टेट एजंटकडून ग्राहकांना चुकीची माहिती मिळायची. यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी आपली फसवणूक केली आहे, असा ग्राहकांचा समज व्हायचा. याबरोबरच अनेकदा एजंटने ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली असल्याची उदाहरणे देखील समोर आली आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्व बाबींची योग्य तांत्रिक माहिती असलेला एजंट असेल तर ग्राहक व बांधकाम व्यावसायिकही त्यावर पूर्ण विश्वास ठेऊ शकतात. त्यामुळे ही प्रमाणपत्र परीक्षा अनिवार्य करीत महारेराने उचललेले हे पाऊल जरुरी तर आहेच शिवाय आश्वासक व स्वागतार्ह्य देखील आहे.
यामुळे घरखरेदीदारांमध्ये जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल शिवाय मध्यस्थांविरोधात महारेराकडे दाद मागणेही शक्य होणार आहे.”
0 Comments